scorecardresearch

अजित पवारांवर टीका करत रोहित पवार म्हणाले,”भाजपसोबत गेलेल्यांना लोकसभेनंतर कमळावर…”

लोकसभा निवडणूक झाल्यानंतर अनेकांना कमळावर लढावे लागेल अशी परिस्थिती होईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले.

rohit pawar and ajit pawar
आम्ही शेवटपर्यंत भाजप विरोधात लढू असे रोहित पवार म्हणाले.(फोटो सौजन्य- प्रातिनिधिक छायाचित्र)

लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेस एकच पार्टी आहे. स्वहित, स्वार्थी राजकारणासाठी काहीजण तिकडे गेले आहेत. लोकसभा निवडणूक झाल्यानंतर अनेकांना कमळावर लढावे लागेल अशी परिस्थिती होईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले. आम्ही शेवटपर्यंत भाजप विरोधात लढू असेही ते म्हणाले.

amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट
ramdas athawle on eknath shinde
एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद धोक्यात? कुणाची वर्णी लागणार? रामदास आठवले म्हणाले…
couple Kulhad Pizza Couple Private MMS Leak
कुल्हड पिझ्झा कपलचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक? सेहज अरोराने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला ‘माझी चूक…’
bachchu kadu on pankaja munde
“…म्हणून पंकजा मुंडेंवर कारवाई झाली असावी”, बच्चू कडूंचं थेट विधान

पिंपरीत बोलताना पवार म्हणाले, निवडणूक आयोग भाजपच्या हातातील बाहुले आहे. त्यामुळे आयोग आम्हाला चिन्ह, नाव देणार नाही. पण, आमच्याकडे पवार साहेब आहेत. त्यामुळे आम्ही लढणार आणि जिंकणार आहोत. भाजप लोकनेत्यांना संपवते. तिकडे गेलेल्या आमच्या नेत्यांनाही हळूहळू संपवतील. भाजपला लोकसभा निवडणुकीचे पडले आहे. त्यांना बाकी काही देणेघेणे नाही.

आणखी वाचा-आमदार रोहित पवार म्हणाले, “अजित पवार गटातील अनेकजण संपर्कात, काहीजण गेले ते…”

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना नेत्यांना संपूर्ण अधिकार होते. पत्रकार परिषदेतही तेच बोलत होते. त्यांचा अंतिम अधिकार, निर्णय असायचा. आता त्यांना तेवढे अधिकार असल्याचे दिसत नाही, असेही पवार म्हणाले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-09-2023 at 14:51 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×