scorecardresearch

लोकसभा लढविणार का? आमदार रोहित पवार म्हणाले.. “मी यावेळी…”

कर्जत-जामखेडमधूनच निवडणूक लढविणार असल्याचे आमदार रोहित पवार यांनी स्पष्ट केले.

rohit pawar on upcoming election
पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवार यांना रोखण्यासाठी नव्हे तर विचार टिकवण्यासाठी आलो असल्याचे त्यांनी सांगितले. (फोटो सौजन्य- प्रातिनिधिक छायाचित्र)

लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : मी लोकसभेची निवडणूक लढणार नाही. मी विधानसभेची निवडणूक लढविणार आहे. कर्जत-जामखेडमधूनच निवडणूक लढविणार असल्याचे आमदार रोहित पवार यांनी स्पष्ट केले. पवार साहेब भाजपचे बाप आहेत. भाजप कुटुंब, पार्टी फोडण्यासाठी जबाबदार आहे, असा आरोपही त्यांनी केला.

Justin truedeo and narendra modi
निज्जर हत्येप्रकरणी भारतावर आरोप करणाऱ्या कॅनडाला उपरती; पंतप्रधान ट्रुडो म्हणाले, “जगभरात भारताचा प्रभाव…”
Love to eat peanut Chiki Viral video from factory think 100 times before eating it
शेंगदाण्याची चिक्की खायला आवडते का? फॅक्टरीमधील व्हायरल व्हिडीओ पाहून चिक्की खाण्यापूर्वी १०० वेळा विचार कराल
Royal Enfield Bullet 350 launched
नाद करायचा नाय! बाकी कंपन्या बघतच राहिल्या, देशात दाखल झाली नवी बुलेट, किंमत फक्त…
eknath shinde bjp flag
“…अन्यथा भाजपात प्रवेश केला असता”, शिंदे गटातील मंत्र्याचं मोठं विधान

पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवार यांना रोखण्यासाठी नव्हे तर विचार टिकवण्यासाठी आलो असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपला हरविण्याची ताकद सामान्य व्यक्ती आणि महाविकास आघाडीमध्ये आहे. सर्वेक्षणामध्ये भाजपची मते घटताना दिसत आहे. सत्तेत असलेले लोक स्वार्थी, हिताचे राजकारण करत आहेत. त्यांच्या बुद्धीत सामान्य लोकांचे हित यावे, अशी गणपतीकडे प्रार्थना करतो.

आणखी वाचा-अजित पवारांवर टीका करत रोहित पवार म्हणाले,”भाजपसोबत गेलेल्यांना लोकसभेनंतर कमळावर…”

मी लोकसभेची निवडणूक लढविणार नाही. त्यामुळे मतदारसंघाचा प्रश्न येत नाही. मी विधानसभा निवडणूक लढविणार आहे आणि ती फक्त आणि फक्त कर्जत- जामखेडमधूनच लढणार आहे. माझ्या मतदारसंघातील नागरिक मला राज्यात जावा, असे सांगतात. ते माझ्यासोबत आहेत. त्यामुळे मी कर्जत जामखेडच्या लोकांना सोडणार नाही. मला लोकसभेत जायचे नाही.

सुप्रिया सुळे यांना पिंपरी-चिंचवड शहरात येण्याची अघोषित बंदी नव्हती. पण, यापुढे त्या शहरात येतील. अजित पवार यांना आदरयुक्त कामामुळे घाबरत होतो. अजूनही घाबरतो, असेही ते म्हणाले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rohit pawar reacts on contest the lok sabha elections pune print news ggy 03 mrj

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×