भाजप सोबत सत्तेत शामील होण्यासाठी रोहित पवार देखील आग्रही होते. असा गौप्यस्फोट करणाऱ्या आमदार सुनील शेळकेंना रोहित पवार यांनी उपासात्मक टोला लगावला आहे. माझी शरद पवार यांच्यासोबतच बैठक झाली नाही तर नरेंद्र मोदी यांच्यासोबत बारा वेळा, अमित शहा यांच्यासोबत तीस वेळा, बराक ओबामा यांची देखील वेळ घेण्याचा प्रयत्न केला, ती मिळाली नाही. त्यानंतर मी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत तीन वेळा बैठक घेतली या सर्व बैठकी झाल्यानंतर मला एक गोष्ट कळली ती म्हणजे भाजपचे नेते हे हेकेखोर आहेत. असा उपासात्मक टोला त्यांनी लगावला आहे.
हेही वाचा >>> पुणेकरांना वर्ल्डकप ट्रॉफी जवळून पाहण्याची संधी मिळणार; ‘या’ दिवशी भव्य रॅलीचं आयोजन
सुनील शेळके यांना त्यांच्या मतदारसंघात अनेक अडचणी आहेत हे विसरू नये असा इशाराही रोहित पवार यांनी दिला आहे. रोहित पवार हे चिंचवडमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. रोहित पवार म्हणाले, सुनील शेळके यांचे वक्तव्य हे हास्यस्पद आहे. मी सर्व आमदारांना घेऊन शरद पवार यांच्याकडे गेलो होतो असं त्यांनी म्हटलं. त्याचबरोबर मी मोदी साहेबांना १२ वेळा अमित शहा यांना ३० वेळा भेटलो. बराक ओबामा यांची देखील वेळ घेतली होती, ती मिळाली नाही. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत तीन वेळा बैठक घेतली असं म्हणत शेळके यांना उपासात्मक टोला लगावला आहे. भाजपच्या विरोधात मी खूप बोलत असल्याने सत्तेत शामिल झालेल्या पैकी चार ते पाच आमदारांनी रणनीती आखली. ते मला टार्गेट करत आहेत. परंतु, त्यांना माझे एक आवाहन आहे की त्यांनी टार्गेट करत असताना अभ्यास करून टार्गेट करावं. सुनील शेळके यांनी हे विसरू नये की त्यांच्या मतदारसंघात देखील बऱ्याच अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी भाजपाची मदत घेतली असावी म्हणून ते अशा प्रकारे वक्तव्य करत आहेत. सुनील शेळके हे भाजपामधून राष्ट्रवादीत आलेले आहेत तिथे अशाप्रकारे वक्तव्ये करत आहेत. असं देखील रोहित पवार यांनी म्हटलं आहे.