वादळी पावसात ३० सप्टेंबर रोजी झालेल्या वाऱ्याच्या प्रचंड वेगामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील नस्त्या (फाइल्स) उडाल्याची चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित झाली असताना, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून त्या फाइल्स नव्हत्या, तर छताचे पॅनल्स होते, असा दावा करण्यात आला आहे. वादळामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील कोणतीही कागदपत्रे अथवा नस्त्या (फाइल्स) उडाल्या नाहीत, असे जिल्हाधिकारी कार्यालय आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा >>> पुणे : चांदणी चौकातील वाहतूक रात्री अडीच तास बंद

pune election duty marathi news, pune election training marathi news
पुणे : निवडणूक प्रशिक्षणाला गैरहजर; पाच हजार कर्मचाऱ्यांवर कारवाई, जिल्हाधिकाऱ्यांची स्पष्टोक्ती
Violation of Right to Information by Regional Psychiatric Hospital in Nagpur
नागपुरातील प्रादेशिक मनोरुग्णालयाकडून माहिती अधिकाराचा भंग, सामाजिक कार्यकर्ते म्हणतात…
Wardha Lok Sabha, Amar Kale,
वर्धा : “कुणी घर देता कां घर…”, अमर काळे यांची शोधाशोध; कार्यालयासाठी…
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा

वादळामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातील नस्त्या उडाल्याची चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित झाली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत चर्चेत आली. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून हे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वास्तूमध्ये ‘अ’, ‘ब’, ‘क’ आणि ‘ड’ अशा चार विंग आहेत. ‘अ’ आणि ‘ब’ विंगमध्ये विविध कार्यालये, ‘क’ विंगमध्ये जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी यांची दालने व ३५० आसन क्षमतेचे प्रेक्षागृह आणि ‘ड’ विंगमध्ये ४ मजली वाहनतळ अशा इमारती आहेत. वाहनतळाच्या इमारतीमधून कर्मचारी व अभ्यागतांना विविध कार्यालयांमध्ये येण्यासाठी ५ मजल्यावर कॉरिडॉर्सची व्यवस्था केलेली आहे. या कॉरिडॉर्सच्या आर.सी.सी स्लॅबखाली आभासी छत (फॉल्स सिलिंग) केलेले आहे.

हेही वाचा >>> पुणे : दहावी, बारावीची परीक्षा खासगीरित्या देणाऱ्या विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक ; संपर्क केंद्रांकडून अतिरिक्त शुल्काची मागणी

कॉरिडॉर्स दोन्ही बाजूस ५ मजली असून ३ मी रुंदीचे आहेत. आभासी छताचे एकूण क्षेत्रफळ ८ हजार चौरस फूट आहे. आभासी छतामध्ये ६० सेंटीमीटर बाय ६० सेेटीमीटर आकाराचे पॅनल्स हे अल्युमिनियम फ्रेमवर तरंगते म्हणजेच आवश्यक तेव्हा काढता येण्यासारखे ठेवलेले असतात. आरसीसी छत व आभासी छत यामधील सेवा वाहिन्याच्या देखभालीच्यादृष्टीने हे पॅनल्स अडकवलेल्या स्थितीत ठेवलेले असतात. ३० सप्टेंबर २०२२ रोजी आलेल्या वादळामध्ये वाऱ्याच्या प्रचंड वेगामुळे या आभासी छताचे बरेचसे पॅनल्स उडून इमारतीच्या परिसरात पडले. हे पॅनल्स वादळात उडतानाची चित्रफीत समाज माध्यमावर प्रसारित (व्हायरल) झाली. त्यामध्ये नस्ती वादळात उडाल्याचा समज सर्वत्र पसरला. मात्र, या वादळामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातील कोणतीही कागदपत्रे, नस्ती उडाल्या नाही; तसेच इमारतीस कुठेही बाधा पोहोचली नसल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा >>> पुणे : महावितरणच्या रोहित्रातील तांब्याच्या तारा चोरणारी टोळी गजाआड ; ग्रामीण भागात रोहित्र चोरीचे १२ गुन्हे उघड

कॉरिडॉर्समधील सर्व आभासी छत फ्रेमवर्कसह व्यावस्थितरित्या काढून घेण्यात येतील. त्यातील क्षतिग्रस्त झालेले पॅनल्स वगळता उर्वरित चांगले पॅनल्स सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत भविष्यात बांधकामे प्रगतीत असलेल्या इमारतींच्या कार्यालयीन कक्षामध्ये आवश्यकता असेल त्या ठिकाणी वापरण्यात येतील, असेही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले.जिल्हाधिकारी कार्यालयातील सदर आभासी छतामध्ये असलेले विद्युत संच हे आरसीसी छताच्या तळाशी जोडून घेण्यात येत आहेत. तसेच छताच्या तळभागास पांढरा रंग देण्यात येत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत भविष्यात हाती घेण्यात येणाऱ्या इमारतींच्या बांधकामामध्ये कॉरिडॉर्स तसेच खुले पॅसेजेसच्या ठिकाणी आभासी छताची उभारणी न करण्याची दक्षता घेण्यात येत आहे, असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी कळवले आहे.