scorecardresearch

रॉटव्हीलर श्वानाचा निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला चावा

रॉटव्हीलर श्वानाचे मालक तुषार भगत आणि त्यांच्या वडिलांवर चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

rottweiler dog bites
रॉटव्हीलर श्वान (संग्रहित छायाचित्र)

पुणे : रॉटव्हीलर जातीच्या श्वानाने एका माजी सहायक पोलिस आयुक्त आणि त्यांच्या श्वानाचा चावा घेतल्याचा प्रकार बुधवारी सकाळी घडला. बाणेर येथील विरभद्र नगरमधील गल्ली क्रमांक तीनच्या रस्त्यावर ही घटना घडली आहे. 

रॉटव्हीलर श्वानाचे मालक तुषार भगत आणि त्यांच्या वडिलांवर चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत निवृत्त सहायक पोलीस आयुक्त सुनील कलगुटकर यांनी तक्रार दिली आहे. 

सुनील कलगुटकर सहाय्यक आयुक्त म्हणून पुण्यातून निवृत्त झाले आहेत. ते बाणेर परिसरात वास्तव्यास आहेत. त्यांच्याकडे एक श्वान आहे. तर, भगत हेदेखील याच परिसरात राहण्यास आहेत. रॉटव्हीलर श्वानाला रहिवाशी भागात ठेवण्यास कायद्याने बंदी आहे. तरीही भगत यांनी या श्वानाला रहिवासी भागात ठेवले. 

दरम्यान, बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास कलगुटकर हे श्वानाला घेऊन फिरायला गेले होते. त्याचवेळी तुषार भगत यांनी त्यांच्या रॉटव्हीलर श्वानाला मोकळे सोडले होते. या श्वानाने कलगुटकर आणि त्यांच्या श्वानाचा चावा घेऊन त्यांना गंभीर जखमी केले. सहाय्यक फौजदार राहीगुडे पुढील तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rottweiler dog bites retired police officer pune print news zws

ताज्या बातम्या