स्टेट बँक ऑफ इंडियात २२ हजारांच्या बनावट नोटा

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील स्टेट बँक ऑफ इंडियात एक हजार, पाचशे, शंभर रुपयांच्या एकूण २२ हजार पाचशे रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील स्टेट बँक ऑफ इंडियात एक हजार, पाचशे, शंभर रुपयांच्या एकूण २२ हजार पाचशे रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सुरेश मुरलीधर गोसावी (वय ५७, रा. मानाजीनगर, नऱ्हेगाव) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये कोणीतरी अज्ञात व्यक्तीने हजार रुपयांच्या अकरा, पाचशेच्या बावीस आणि शंभरच्या चार बनावट नोटा भरणा केल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक बेडवाल हे अधिक तपास करत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Rs 22 thousand duplicate notes in sbi

ताज्या बातम्या