माजी आमदार रामभाऊ मोझे यांच्या भाच्याच्या घरातून १०० औन्स दागिन्यांसह रोख ४ लाख रुपयांची चोरी

मनोहर मोझे यांच्या घरातून तिघा चोरटय़ांनी १०० तोळे सोने आणि रोख चार लाख रुपये चोरून नेल्याची घटना घडली आहे.

(संग्रहित छायाचित्र)
पुण्यातील संगमवाडी गावात माजी आमदार रामभाऊ मोझे यांचे पुतणे हरिश्चंद्र मनोहर मोझे आणि मोहन मनोहर मोझे यांच्या घरातून तिघा चोरटय़ांनी १०० तोळे सोने आणि रोख चार लाख रुपये चोरून नेल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे संगमवाडी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,हरिश्चंद्र मनोहर मोझे आणि मोहन मनोहर मोझे या दोघांचे कुटुंब बाहेर गावी फिरण्यास गेले होते.ते आज घरी आल्यावर घरातील वस्तु इतरत्र पडलेल्या दिसल्या.कपाटातील दागिने,पैसे जागेवर नव्हते. घरात चोरी झाल्याचे स्पष्ट झाले.त्यानंतर मोझे कुटुंबीयांनी आम्हाला माहिती देताच, आम्ही घटनास्थळी जाऊन पाहणी केली.त्यानंतर घराच्या परिसरात लावण्यात आलेले सीसीटीव्हीची पाहिले असता. तेव्हा तिघे जण घरात शिरून काही तासात १०० तोळे सोने आणि जवळपास चार लाखांची रक्कम घेऊन पसार झाले आहे. आता त्या आधारे आम्ही तपास करीत असल्याचे येरवडा पोलिसांमार्फत सांगण्यात आले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Rs 4 lakh in cash along with 100 ounce jewellery theft from the house of nephew of former mla zws 70 svk

ताज्या बातम्या