scorecardresearch

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत रविवारी पुण्यात, प्रसाद प्रकाशनाच्या अमृतमहोत्सवी सांगता समारंभाला राहणार उपस्थित

प्रसाद प्रकाशनाचा अमृतमहोत्सवी सांगता समारंभ रविवारी (८ जानेवारी) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डाॅ. मोहन भागवत यांच्या उपस्थितीत होत आहे.

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत रविवारी पुण्यात, प्रसाद प्रकाशनाच्या अमृतमहोत्सवी सांगता समारंभाला राहणार उपस्थित
मोहन भागवत (संग्रहित छायाचित्र)

पुणे : प्रसाद प्रकाशनाचा अमृतमहोत्सवी सांगता समारंभ रविवारी (८ जानेवारी) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डाॅ. मोहन भागवत यांच्या उपस्थितीत होत आहे.

बालगंधर्व रंगमंदिर येथे सायंकाळी साडेसहा वाजता होणाऱ्या कार्यक्रमास मूर्तिशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती प्रसाद प्रकाशनाच्या संचालिका डॉ. उमा बोडस यांनी मंगळवारी दिली.

(पुणे : खड्डे दुरुस्तीसाठी २२१ कोटींची उधळपट्टी, तरीही रस्त्यांची दुरवस्था कायम, आता ४०० कोटींची आवश्यकता)

या कार्यक्रमात डॉ. संकेत पोंक्षे लिखित ‘गंधशास्त्र’, डॉ. रमा गोळवलकर लिखित ‘प्रक्रिया स्वरुपा देवता’, आशुतोष बापट लिखित ‘भारतीय कलेतील मिथक शिल्पे’, डॉ. सच्चिदानंद शेवडे लिखित ‘मंथन’, पांडुरंग भागवत लिखित ‘किं एकचि दिसे दुसरे…. मला भावलेली ज्ञानेश्वरी’, उमा बोडस लिखित ‘प्राचीन व्यवस्थापनशास्त्र’ या पुस्तकाच्या हिंदी आणि इंग्रजी आवृत्ती, डॉ. अंजली पर्वते लिखित ‘साहित्य प्रसादाची अंजुली’ आणि वादिराज लिमये लिखित ‘श्रीवादिराजयति’ या पुस्तकांचे, तसेच अनाहत प्रकाशनातर्फे अनिल शिंदे लिखित ‘संकल्पना : शोध आणि बोध’, डॉ. रमा गोळवलकर लिखित ‘शोध अस्मितेचा’ आणि ‘खर्जुरवाहिका व इतर कथा’ या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात येणार आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-01-2023 at 11:36 IST

संबंधित बातम्या