पुणे : इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्चात झालेली वाढ आणि अन्य सर्वच सेवा-सुविधांच्या दरात होत असलेल्या वाढीच्या कचाटय़ात साबुदाणा सापडला असून तामिळनाडूतील साबुदाणा उत्पादक कंपन्यांनी अचानक दरात वाढ केली आहे. साबुदाण्याच्या दरात प्रतिकिलोमागे तीन ते पाच रुपयांनी वाढ झाली आहे. व्रतवैकल्यांचे महिने वगळता साबुदाण्याचे दर वर्षभर स्थिर असतात. मात्र इंधन दरवाढीमुळे वर्षांत दुसऱ्यांदा साबुदाण्याच्या दरात वाढ झाली आहे.

गेले काही महिने साबु दाण्याचे दर स्थिर होते. मात्र, सातत्याने इंधन दरवाढ होत असल्यामुळे वाहतूक खर्च वाढला आहे. साबुदाणा उद्योगांना लागणाऱ्या पायाभूत सुविधांच्या दरातही वाढ झाली आहे. त्यामुळे तामिळनाडूतील साबुदाणा उत्पादक तसेच प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांनी साबुदाणा दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. वाहतूक खर्च, उत्पादन खर्च वाढल्याने साबुदाणा उत्पादक कंपन्यांना मोठा तोटा सहन करावा लागत असून तोटा भरून काढण्यासाठी दरात वाढ करण्यात आल्याचे मार्केट यार्डातील साबुदाणा व्यापारी अशोक लोढा यांनी सांगितले. 

ola uber pune ban marathi news
पुण्यात ओला, उबर सुरू राहणार? जाणून घ्या अंतिम निर्णय कधी होणार…
mumbai municipal corporation, transparent administration
मुंबई महापालिकेचा कारभार पारदर्शी होणार? नागरिकांशी संवाद, संपर्क वाढविण्याचे मनपा आयुक्तांचे अधिकाऱ्यांना आवाहन
LinkedIn, top companies, india
वित्तीय, तंत्रज्ञान क्षेत्राची आघाडी; लिंक्डइनकडून देशातील मोठ्या २५ कंपन्यांची यादी जाहीर
Planning of extra bus service by state transport due to holidays
नाशिक : सुट्यांमुळे राज्य परिवहनतर्फे जादा बससेवेचे नियोजन

तामिळनाडूतील उत्पादकांनी साबुदाण्याच्या दरात क्विंटलमागे ३०० रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात एक किलो साबुदाण्याच्या दरात तीन ते पाच रुपयांनी वाढ झाली असल्याचे सांगण्यात आले. घरगुती ग्राहकांच्या तुलनेत हॉटेल चालकांकडून साबुदाण्याला चांगली मागणी आहे.

दरात तेजी

व्रतवैकल्यांच्या श्रावण महिन्यात उपवासासाठी साबुदाण्याच्या मागणीत मोठी वाढ होत असल्याने साबुदाण्याचे दर तेजीत असतात. त्यानंतर साबुदाण्याचे दर वर्षभर स्थिर असतात. तामिळनाडूत साबुदाणा उत्पादन होते. तेथील उद्योगांकडून देशभरात साबुदाणा विक्रीस पाठविला जातो. महाराष्ट्रातही तामिळनाडूतून साबुदाणा येतो. श्रावण, भाद्रपद, अश्विन या तीन महिन्यात साबुदाण्याला मागणी असते. साबुदाणा उत्पादकांनी दरवाढ करण्याचा निर्णय घेतल्याने यापुढील काळात साबुदाण्याचे दर तेजीत राहणार असल्याचे साबुदाणा व्यापारी अशोक लोढा यांनी सांगितले.

किरकोळ बाजारातील साबुदाण्याचे किलोचे दर

* मध्यम प्रतीचा साबुदाणा : ४८ ते ५२ रुपये किलो

* उच्च प्रतीचा साबुदाणा : ५२ ते ५४ रुपये किलो