scorecardresearch

Premium

पीएमपीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी सचिंद्र प्रताप सिंह; ओमप्रकाश बकोरिया यांची बदली

पीएमपीचा संचलन तोटा कमी करण्याचे आव्हान सचिंद्र प्रताप सिंह यांच्यापुढे असणार आहे.

Sachindra Pratap Singh, Managing Director, PMPML, Pune, Pimpri chinchwad
पीएमपीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी सचिंद्र प्रताप सिंह; ओमप्रकाश बकोरिया यांची बदली

पुणे : पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांची बदली करण्यात आली आहे. ओमप्रकाश बकोरिया यांच्या जागी सचिंद्र प्रताप सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून याबाबतचे आदेश काढण्यात आले असून सचिंद्र प्रताप सिंह यांनी पीएमपीच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदाचा कार्यभार गुरुवारी स्वीकारला.

पीएमपीच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदी ओप्रकाश बकोरिया यांची गेल्या नऊ महिन्यांपूर्वी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, गुरुवारी सायंकाळी त्यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराची प्रमख सार्वजनिक सेवा असलेल्या पीएमपीच्या कारभाराला गती देण्याचा प्रयत्न बकोरिया यांनी केला. नवीन बस खरेदी धोरणांतर्गत पीएमपीच्या स्वमालकीच्या गाड्या खरेदीला त्यांनी प्राधान्य दिले. पीएमपीच्या सर्वाधिक गाड्या त्यांनी संचलनात आणल्या. याशिवाय मार्गांचे सुसूत्रीकरण करताना सातव्या वेतन आयोगाची अंमलबाजवणी, ठेकेदारांना शिस्त, कर्मचारी पदोन्नती, भरती प्रक्रिया त्यांनी तातडीने राबविली होती.

rohit pawar
‘रोहित पवार यांच्या बारामती अ‍ॅग्रोकडून नियमांचे उल्लंघन’; अंतरिम दिलासा रद्द करण्याची एमपीसीबीची मागणी
mill workers mhada
घरांचा साठा रोखणारा ‘म्हाडा’ निर्णय गृहनिर्माण मंत्र्यांच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत
case registered three people filming drone cameras ​​Air Force Base Lonavala pune
लोणावळ्यात हवाई दल तळाच्या परिसरात ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे चित्रीकरण; हैदराबादमधील तिघेजण ताब्यात
rajput
नागपूर: पोलीस निरीक्षक राजपूत यांच्याकडून तपास काढला; लैंगिक अत्याचार, छळ प्रकरण

हेही वाचा… पुण्यातील काँग्रेसला उशिरा का होईना आली जाग… आता दर सोमवारी बैठक

हेही वाचा… पुणे : पोलीस कर्मचार्‍याची घरात गळफास घेऊन आत्महत्या

दरम्यान, सचिंद्र प्रताप सिंह यांनी गुरुवारी सायंकाळी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदाचा कार्यभार स्वीकारला. पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डाॅ. कुणाल खेमनार यांनी त्यांना पदभार दिला. सचिंद्र प्रताप सिंह यापूर्वी पशुसंवर्धन विभागात आयुक्तपदी कार्यरत होते. त्यांची या पदावरून बदली करण्यात आली होती. मात्र, नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते. पीएमपीचा संचलन तोटा कमी करण्याचे आव्हान सचिंद्र प्रताप सिंह यांच्यापुढे असणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sachindra pratap singh is a new managing director of pmpml pune print news apk 13 asj

First published on: 07-07-2023 at 13:37 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×