पुणे : हवाई दलातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्याच्या कर्तृत्वाला आणि पराक्रमाला वंदन करीत सैनिक मित्र परिवारने विजयादशमीचे सीमोल्लंघन केले. देशभक्तीने भारावलेल्या या कार्यक्रमातून सेनाधिकाऱ्यांविषयी आदरभाव व्यक्त करण्यात आला. सैनिक मित्र परिवार व सहयोगी संस्थांतर्फे देशासाठी प्राणांची बाजी लावणारे आणि वयाची ८५ वर्षे ओलांडलेले हवाई दलाचे निवृत्त अधिकारी शरदचंद्र फाटक यांचा जनता सहकारी बँकेचे संचालक अमित घैसास यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. अमर लांडे यांनी साकारलेल्या रंगावलीने आणि खळदकर बंधू यांनी सनई-चौघडा वादनाने सर्वांचे स्वागत केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सेवा मित्र मंडळाचे शिरीष मोहिते, तुळशीबाग मंडळाचे नितीन पंडित, आयुर्विमाच्या सहाय्यक प्रशासकीय अधिकारी योगिनी पाळंदे, त्वष्टा कासार समाज ग्रंथालयाचे गिरीश पोटफोडे, आयोजक आनंद सराफ, किरण पाटोळे, सुवर्णा बोडस, कल्याणी सराफ, शरद खळदकर, सुनील हिरवे, होनराज मावळे या वेळी उपस्थित होते.फाटक म्हणाले, आधुनिक शस्त्रास्त्रांबरोबरच देशवासियांची कृतज्ञता सैन्यदलाचे मनोबल वाढवणारी ठरते.

हेही वाचा : पुणे : अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्ती रकमेत वाढ ; सुधारित मार्गदर्शक सूचना जाहीर

केवळ युद्धप्रसंगाच्या वेळी अनेकांना सैनिकांची आठवण होते. तसे न करता सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती, जनतेने कायमच विश्वस्त भावनेने कार्यरत रहायला हवे. सराफ म्हणाले, १९९६ पासून सैनिकांसाठी कृतीशील काम करण्याचा प्रयत्न सैनिक मित्र परिवाराच्या माध्यमातून केला जात आहे. तिरंगी झेंडयासाठी प्राण पणाला लावणाऱ्या सैनिकांच्या प्रत्येक सणाला पहिला मान आहे. त्यामुळे त्यांच्या घरी जाऊन हे सण साजरे करण्याचा आमचा प्रयत्न आहे. 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sainik mitra parivar awarded retired air force officer vijayadashmi pune print news tmb 01
First published on: 06-10-2022 at 16:43 IST