जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण आज(मंगळवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. या सोहळ्यासाठी श्री क्षेत्र देहू येथे आज पंतप्रधान मोदी आले आहेत. यावेळी भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी देहूचे शिळा मंदिर हे केवळ भक्तीच्या शक्तीचेच केंद्र नाही तर भारताच्या सांस्कृतिक भविष्याला देखील प्रशस्त करते. तसेच, संत तुकाराम महाराजांचे अभंग आम्हाला ऊर्जा देत आहेत, मार्ग दाखवत आहेत. असे म्हटले. आषाढी वारीसाठी सोमवारी (२० जून) तुकोबांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होणार असून, त्यापूर्वी लोकार्पणाचा सोहळा होत असल्याने वारकऱ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण दिसून आले.

पंतप्रधान मोदी म्हणाले, “भगवान श्री विठ्ठल आणि सर्व वारकऱ्यांच्या चरणावर माझे कोटी कोटी वंदन. आपल्या शास्त्रांमध्ये सांगण्यात आलं आहे, मनुष्य जन्मात सर्वात दुर्लभ संतांचा सत्संग आहे. संतांची कृपा झाली, तर ईश्वराची अनुभती आपोआप होते. आज देहूच्या या पवित्र, तीर्थ भूमीवर मला येण्याचं भाग्य लाभलं आणि मी देखील इथे तिच अनुभती घेत आहे. देहू संतशिरोमणी जगद्गुरू तुकाराम महाराजांचे जन्मस्थळ आहे, कर्मस्थळ देखील आहे. धन्य देहू गाव, पुण्यभूमी ठाव. तेथे नांदे देव पांडुरंग, धन्य क्षेत्रवासी लोक ते देवाचे. उच्चारीती वाचे नामघोष. देहूमध्ये पांडुरंगाचा नित्य निवास देखील आहे आणि इथला प्रत्येकजण स्वत: देखील भक्तीने ओतप्रोत असा संतस्वरुपच आहे. या भावानेने मी देहूतील सर्व नागरिकांना माझ्या माता-भगिनींना आदरपूर्वक नमन करतो.”

वसंत मोरेंच्या प्रश्नावर राज ठाकरेंनी ‘अशी’ दिली प्रतिक्रिया, म्हणाले…
A proposal that Chhagan Bhujbal should contest elections from Nashik from BJP
‘कमळ’वर लढण्याचा भुजबळ यांना प्रस्ताव? ओबीसी मतपेढीसाठी भाजप पक्षश्रेष्ठींची खेळी
Rape Survivor Rajasthan
बलात्कार पीडितेला संतापजनक कारण देत बारावीची परीक्षा देण्यापासून रोखलं; शाळेनं म्हटलं, “वातावरण खराब..”
Recruitment for posts of Police Constables refusal to grant interim stay to order of extra marks to transgender
पोलीस हवालदार पदांसाठी भरती, तृतीयपंथीयांना अतिरिक्त गुण देण्याच्या आदेशाला अंतरिम स्थगिती देण्यास नकार

PM Modi Maharashtra Visit Live :पंढरपूरची वारी संधीच्या समानतेचं प्रतिक- नरेंद्र मोदी

तसेच, “काही महिन्यापूर्वी मला पालखी मार्गातील दोन राष्ट्रीय राजमार्गांच्या चौपदरी करण्याच्या कामाचे उद्घटान करण्याची संधी मिळाली होती. श्री संत ज्ञानेश्वर महारज पालखी मार्गाची निर्मिती पाच टप्प्यांमध्ये होईल आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गाची निर्मिती तीन टप्प्यांमध्ये पूर्ण केली जाईल. या सर्व टप्प्यांमध्ये ३५० किलोमीटर पेक्षा जास्त लांबीचे महामार्ग बनतील आणि यावर ११ हजार कोटींपेक्षाही जास्त रुपये खर्च केले जातील.या प्रयत्नांनी क्षेत्राच्या विकासाला देखील गती मिळेल.” असंही मोदींनी यावेळी सांगितलं.

याचबरोबर, “आज नशीबाने पवित्र शिळा मंदिराच्या लोकार्पणासाठी मला देहूत येण्याची संधी मिळाली आहे. ज्या शिळेवर स्वत: संत तुकारामांनी १३ दिवस तपस्या केलेली आहे, जी शिळा संत तुकारामांच्या बोध आणि वैराग्याची साक्ष बनलेली आहे, मी असं मानतो की ती केवळ एक शिळा नाही, ती तर भक्ती आणि ज्ञानाची आधारशिळा स्वरुप आहे. देहूचे शिळा मंदिर हे केवळ भक्तीच्या शक्तीचेच केंद्र नाही तर भारताच्या सांस्कृतिक भविष्याला देखील प्रशस्त करते. या पवित्र ठिकाणाची पुर्ननिर्मिती करण्यासाठी मी मंदिर न्यास आणि सर्व भक्तांचे हृदयपूर्वक अभिनंद करतो, आभार व्यक्त करतो.” असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

भारत शाश्वत आहे कारण भारत संतांची भूमी आहे –

“सध्या देश आपल्या स्वातंत्र्याचा अमृतमोहत्सव साजरा करत आहे. आम्हाला अभिमान आहे की आम्ही जगातील प्राचीन जीवित सभ्यतांपैकी एक आहोत. याचं श्रेय जर कोणाला जात असेल, तर भारताच्या संत परंपरेला आहे. भारताच्या ऋषींना आहे. भारत शाश्वत आहे कारण भारत संतांची भूमी आहे.” अशा शब्दांमध्ये मोदींनी देशातील संत परंपरेबद्दल मत व्यक्त केलं.

जो भंग होत नाही तो तर अभंग –

तर, “संत तुकाराम महाराज हे संत संप्रदायाच्या मंदिराचा कळस आहेत. संत तुकाराम महाराजांच्या अभंगांनी आपल्या पिढ्यांना प्रेरणा दिली आहे. जो भंग होत नाही, जो वेळेसोबत शाश्वत आणि प्रासंगिक राहतो तोच तर अभंग असतो. आज देखील देश जेव्हा आपल्या सांस्कृतिक मूल्यांच्या आधारावर पुढे जात आहे, तेव्हा संत तुकारामांचे अभंग आम्हाला ऊर्जा देत आहेत, मार्ग दाखवत आहेत.” असंही पंतप्रधान मोदींनी बोलून दाखवलं.