भाडेतत्वावर घेतलेल्या मोटारींची परस्पर विक्री केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या वाहन चोरी विरोधी पथकाकडून दोघांना अटक करण्यात आली. आरोपींनी भाडेतत्वावर घेतलेली वाहनं परस्पर विकले होते. पोलिसांनी आरोपींकडून ३० लाख रुपये किमतीची ८ वाहनं जप्त केली आहेत. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुमीत यादवराव खेरडे (वय ३०, सध्या रा. ॲव्होलॉन हाईट, हिंजवडी, मूळ रा. गनोरी, ता. बाभुळगाव, जि. यवतमाळ) आणि गणेश तुकाराम भालसिंग (वय ३१, सोनिवडी रस्ता, केडगाव, जि. अहमदनगर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावं आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, महेश बाळकृष्ण सूर्यवंशी (वय २६, रा. आंबेगाव पठार, साईसिद्धी चौक, कात्रज) यांनी प्रशांत खुरपे उर्फ पाटील याला भाडेतत्वावर मोटार दिली होती. खुरपेने सूर्यवंशीची मोटार आरोपी खेरडे आणि भालसिंगला भाडेतत्वावर दिली होती.

आरोपींनी खुरपेला भाडं दिलं नाही. तर खुरपेकडून सूर्यवंशी यांना भाडं देण्यात आलं नव्हतं. त्यामुळे सूर्यवंशीने मोटार परत करण्यास सांगितले. पण आरोपी खेरडे आणि भालसिंगने खुरपेला मोटार आणि भाडं दोन्ही देत नव्हते. या प्रकरणाची माहिती गुन्हे शाखेच्या दरोडा आणि वाहन चोरी विरोधी पथकाला मिळाली होती.

त्यानंतर पोलिसांनी खेरडे आणि भालसिंगचा शोध घेण्यास सुरुवात केली. आरोपींचा सुगावा लागल्यानंतर पोलिसांनी त्यांना सापळा रचून अटक केली. चौकशीत आरोपींनी भाडेतत्वावर घेतलेल्या आठ मोटारींची परस्पर विक्री केल्याचे उघडकीस आलं. पोलिसांनी दोघांकडून ३० लाख रुपयांच्या आठ मोटारी जप्त केल्या आहेत. सहायक आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम, उपनिरीक्षक शुभांगी नरके, शाहीद शेख, निलेश शिवतरे, धनंजय ताजणे, मॅगी जाधव आदींनी ही कारवाई केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sale 8 leased vehicles without asking to owner 2 accused arrested pune print news rmm
First published on: 15-05-2022 at 22:07 IST