पुणे : मार्केट यार्डातील फळबाजारात केरळ आंब्याची विक्री देवगड हापूस म्हणून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. देवगड हापूसच्या नावाखाली ग्राहकांच्या माथी केरळमधील आंबा मारण्यात येत असल्याची तक्रार आल्यानंतर बाजार समितीने ही कारवाई केली. अडत्यांकडून सात हजार ८० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून एक डझन आंब्यांची ४२ खोकी जप्त करण्यात आली आहेत. या कारवाईमुळे केरळ, कर्नाटकमधील आंबे देवगड तसेच रत्नागिरी हापूसच्या नावाखाली ग्राहकांच्या माथी मारणाऱ्या अडत्यांना जरब बसणार आहे.

कोकणातील देवगड आणि रत्नागिरीहून बाजारात आंब्यांची आवक सुरू झाली आहे. केरळ, कर्नाटकातील आंब्यांच्या तुलनेत कोकणातील आंब्यांना अधिक मागणी असते. परराज्यातील आंब्यांच्या तुलनेत कोकणातील आंब्यांची प्रतवारी आणि चवही चांगली असते. बाजार आवारातील काही अडते केरळ, कर्नाटकातील आंब्यांची विक्री देवगड आणि रत्नागिरी हापूसच्या नावाखाली बाजार आवारात करत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या.त्यानंतर बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांच्या मार्गदर्शनाखाली फळ विभाग प्रमुख बाबासाहेब बिबवे, कर्मचारी देवानंद खराडे आणि तोलणारांनी तीन अडत्यांवर कारवाई करून त्यांच्याकडून आंब्यांची ४२ खोकी जप्त केली.  आंब्यांचा हंगाम बहरात येण्यापूर्वी बाजार आवारातील काही अडत्यांनी हापूस आंब्यांच्या नावाखाली कर्नाटक, केरळमधील आंब्यांची विक्री सुरू केल्यामुळे बाजार समितीने त्यांच्यावर केलेल्या कारवाईमुळे गैरप्रकारांना चाप बसणार आहे.

Puppy beaten, Pimpri,
Video : पिंपरीत श्वानाच्या पिल्लाला बेदम मारहाण; गुन्हा दाखल, मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल
stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा
ST buses
एसटीच्या मार्गात आचारसंहितेचा अडथळा

आंब्यांमधील फरक कसा ओळखाल?

मार्केट यार्डातील काही अडते रत्नागिरी, देवगड हापूसच्या खोक्यांमध्ये केरळ, कर्नाटकातील आंबे भरतात. केरळ, कर्नाटकातील आंबा तसेच कोकणातील आंब्यांमधील फरक ग्राहकांना कळत नाही. कोकणातील आंबा रसाळ, चवीला गोड असतो. हापूस आंब्यांचा गर केशरी असतो. देवगड, रत्नागिरी हापूस आंब्यांची साल पातळ असते. कर्नाटक, केरळमधील आंब्यांची साल जाड असते.केरळ आंब्यांची देवगड हापूसच्या नावाखाली विक्री करण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला. ग्राहकांची फसवणूक रोखण्यासाठी बाजार समितीच्या प्रवेशद्वार क्रमांक एकवर आंब्यांचा लिलाव करण्यात येणार आहे. सकाळी अकरा वाजेपर्यंत लिलावाची प्रक्रिया पार पडेल. लिलावास प्रतिसाद न मिळाल्यास आंबे अडत्यांमार्फत दुपारी बारा वाजेपर्यंत विकण्यात येतील. अडत्यांनी गैरप्रकार केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.

– मधुकांत गरड, प्रशासक, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे</p>