पुणे :कोथरुड, दत्तवाडी भागात अमली पदार्थांची विक्री; साडेचार लाखांचे अमली पदार्थजप्त, तिघे अटकेत | Sale of drugs in Kothrud Dattawadi area pune print news amy 95 | Loksatta

पुणे :कोथरुड, दत्तवाडी भागात अमली पदार्थांची विक्री; साडेचार लाखांचे अमली पदार्थजप्त, तिघे अटकेत

कोथरुड, दत्तवाडी भागात अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या तिघांना अमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले.

पुणे :कोथरुड, दत्तवाडी भागात अमली पदार्थांची विक्री; साडेचार लाखांचे अमली पदार्थजप्त, तिघे अटकेत
संग्रहित छायाचित्र

कोथरुड, दत्तवाडी भागात अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या तिघांना अमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले. त्यांच्याकडून साडेचार लाखांचे मेफेड्रोन, गांजा जप्त करण्यात आला.दत्तवाडी भागात गांजा विक्रीसाठी आलेल्या एकास अटक करण्यात आली. नरेंद्र रामदास बोराडे (वय ३३, रा. अचानक चौक, उत्तमनगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्याकडून दहा हजार ३८० रुपयांच ५१९ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला.

हेही वाचा >>>पुणे: कोरेगाव पार्क, लोहगावमधील गोळीबार प्रकरणातील आरोपींना अटक

कोथरुड भागातील भेलकेनगर परिसरात मेफेड्रोन विक्रीसाठी आलेल्या दोघांना पोलिसांनी पकडले. रोहन रत्नाकर दळवी (वय ३०, रा. सुंदर गार्डन, भेलकेनगर, कोथरुड), कुणाल रमेश पाटील (वय ३२, रा भूमी स्लिव्हरिओ, देहू-आळंदी रस्ता, मोशी ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून चार लाख ५९ हजार रुपयांचा २९ ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले.

हेही वाचा >>>राज्यात थंडीच्या हंगामातील उकाडा; मोठ्या पावसाची शक्यता नाही

पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक निरीक्षक शैलजा जानकर, सुजीत वाडेकर, मनोज साळुंके, मारुती पारधी, पांडुरंग पवार, विशाल दळवी आदींनी ही कारवाई केली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-11-2022 at 14:40 IST
Next Story
पुणे: कोरेगाव पार्क, लोहगावमधील गोळीबार प्रकरणातील आरोपींना अटक