संभाजीराजे छत्रपती यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित ‘हर हर महादेव’ आणि ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या मराठी चित्रपटांवर आक्षेप घेतला आहे. या चित्रपटांमध्ये इतिहासाची मोडतोड करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना संभाजीराजेंनी मराठी निर्माते, दिग्दर्शकांना ‘इतिहासाचा विपर्यास केला तर आपल्याशी गाठ आहे’ अशा शब्दांत जाहीर इशारा दिला आहे. यावेळी त्यांनी बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्यावरही भाष्य केलं.

नुकतंच महेश मांजरेकर यांनी ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या आपल्या मराठी चित्रपटाची घोषणा केली असून त्याचं पोस्टर रिलीज केलं आहे. या चित्रपटात अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. यानंतर सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली असून अनेकांनी अक्षयच्या निवडीवर आक्षेप घेतला आहे.

Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray in Ramtek Lok Sabha constituency campaign
बाळासाहेब ठाकरे आम्हाला सवंगडी समजायचे, ‘हे’ घरगडी समजत होते; एकनाथ शिंदे यांची टीका
sanjay mandlik
राजे-मंडलिक गट यापुढेही समन्वयाने काम करेल – खासदार संजय मंडलिक
latur lok sabha marathi news, shivraj patil chakurkar latur latest news in marathi
शिवराज पाटील यांच्या ‘देवघरा’ बाहेरील गर्दी वाढली
Dilip Mohite patil,Shivajirao Adhalarao Patil
“आमच्यावर अविश्वास दाखवलात तर…”, पक्षप्रवेशावेळी मोहिते पाटलांचा शिवाजीराव आढळरावांना इशारा

Chhatrapati Shivaji Maharaj: …तर याद राखा, गाठ माझ्याशी आहे, संभाजीराजेंचा मराठी दिग्दर्शक-निर्मात्यांना जाहीर इशारा

दरम्यान संभाजीराजे यांनी अक्षय कुमारने शिवरायांची भूमिका साकारणं पटतं का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले, कोणीही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करु शकतो. जर त्यांचं मन स्वच्छ असेल आणि महाराजांची योग्य प्रतिमा साकारली जाणार असेल तर आमचा पाठिंबा आहे. पण जर इतिहासाची मोडतोड आणि विपर्यास होणार असेल तर अक्षय कुमार असो किंवा आघाडीचा कोणताही अभिनेता असला तरी आम्ही आडवं येणार.

मराठी चित्रपट निर्माते, दिग्दर्शकांना इशारा

“छत्रपती शिवाजी महाराज किंवा मावळ्यांवर आधारित चित्रपटात इतिहासाशी छेडछाड केली जाऊ शकत नाही. ‘हर हर महादेव’ चित्रपटात इतिहासाची मोडतोड आणि विपर्यास केला आहे. असे चित्रपट लोकांसमोर नेले जात आहेत. महाराज आपली अस्मिता आणि प्रेरणा आहेत. सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावे आपण काहीही दाखवत आहोत. इतिहासाचा गाभा सोडता कामा नये,” असं संभाजीराजे म्हणाले आहेत.

‘हर हर महादेव’, ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटावर संभाजीराजे संतापले, इतिहासाची मोडतोड केल्याचा आरोप

“इतिहासावर आधारित चित्रपट काढले जातात ही चांगली गोष्ट आहे. पण लोकांना आवडतात म्हणून विपर्यास करुन असले चित्रपट काढत आहात,” असा संताप संभाजीराजेंनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटातील मावळ्यांच्या पोषाखावरही भाष्य केलं. चित्रपटाचं पोस्टर दाखवत ‘हे मावळे वाटतात का?’ अशी विचारणा त्यांनी केली.

“मी सर्व निर्माते आणि दिग्दर्शकांना सांगू इच्छितो की, जर असेच चित्रपट काढले तर गाठ माझ्याशी आहे. चित्रपट काढून तर दाखवा, मी आडवा नाही आलो तर बघा. मीच आडवा येणार, अन्यथा या घराण्यात जन्म होऊन काय फायदा आहे. वेळप्रसंगी मला काही झालं तरी चालेल, पण महाराजांचा असा चुकीचा इतिहास समोर आणत असाल तर याद राखा,” असा जाहीर इशारा यावेळी त्यांनी दिला. जरा भालजी पेंढारकर यांचा आदर्श घ्या असा सल्लाही त्यांनी दिला.