पुणे : नृत्य उपचारांचा (डान्स थेरपी) आशियातील पहिला पदव्युत्तर अभ्यासक्रम पुण्यातील संचेती हेल्थके अर अकॅ डमीने सुरू के ला आहे. पुणे विद्यापीठाच्या सहकार्यातून हा अभ्यासक्रम चालवण्यात येत आहे. आरोग्य क्षेत्रात कलेचा वापर उपचारांसाठी करण्याबाबत जागरुकता निर्माण करण्यात हा अभ्यासक्रम मोलाचे योगदान देईल.

नृत्य उपचारांचा वापर वैद्यकीय आणि मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात सुरू झाला आहे. बालपणातील समस्या शोधण्यासाठी किं वा अध्यापनशास्त्रात सर्जनशील साधने तयार करण्यासाठी या उपचारांचा वापर के ला जात आहे. लहान तसेच पौगंडावस्थेतील मुले, ज्येष्ठ नागरिक, जुनाट आजारांनी ग्रासलेले रुग्ण, दीर्घकालीन उपचारांसाठी रुग्णालयात राहणारे रुग्ण यांच्यावरील उपचारांसाठी नृत्य उपचार सहाय्य करतात. विशेषत: मानसिक आजारांच्या उपचारांमध्ये नृत्याद्वारे उपचार परिणामकारक ठरतात. कला, मानसशास्त्र, नृत्य क्षेत्रातील विद्यार्थी तसेच डॉक्टर, व्यावसायिक, प्रशिक्षक या व्यावसायिक पदवीचा लाभ घेऊ शकतात.

अभ्यासक्रमाच्या सहसंस्थापक डॉ. निकिता मित्तल म्हणाल्या, नृत्य उपचारातील पदव्युत्तर पदवीसाठी अनेक विद्यार्थी परदेशात जातात. या अभ्यासक्रमाचा उद्देश भारतीय सांस्कृतिक समृद्धी जपणे आणि वृद्धिंगत करणे हा आहे. सध्याच्या महासाथीसारख्या काळात मानसिक आरोग्य आणि व्यक्तिगत विकासासाठी नृत्य उपचारांसारख्या गोष्टी परिणामकारक ठरतात. पर्यायी उपचारपद्धती मानवाला आरोग्यासाठी सुरक्षा, अभिव्यक्ती प्रदान करतात. त्यामुळे या विषयातील पदव्युत्तर पदवी अभ्यास महत्त्वाचा आहे.

आरोप काय?

निवेदनात करण्यात आलेल्या आरोपानुसार, दिनेश डोके हे जिप या संवर्गात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संवर्गात असून अतिरिक्त आयुक्त समाज कल्याण हे समकक्ष पद नाही. शासन निर्णय १७-१२-२०१६ अन्वये त्याच अथवा समकक्ष पदावर प्रतिनियुक्ती करण्यात येते. अतिरिक्त आयुक्त समाज कल्याण हे पद एकाकी असल्याने मूळ मंजूर संवर्ग संख्येच्या कमाल १५ टक्केपेक्षा अधिक प्रमाणात प्रतिनियुक्ती करता येत नाही. सदर पदाच्या सेवाप्रवेश नियमात १५ टक्के पेक्षा अधिक प्रमाणात प्रतिनियुक्तीने पद भरण्याबाबत कोणतीही सुधारणा करण्यात आली नसल्याने सदर पदावर प्रतिनियुक्तीने पद भरता येत नाही. पद भरताना परिस्थिती काय होती हे स्पष्ट करण्यात आले नाही. प्रतिनियुक्ती पूर्वी संबंधित अधिकारी यांचे गोपनिय अहवाल, कर्तव्यपरायणता, सचोटी आणि चारित्र्य याबाबतची तपासणी मूळ संवर्ग नियंत्रण प्राधिकारी यांनी करून मागील दहा वर्षांच्या कालवधीत झालेल्या शिक्षेचा तपशील उपलब्ध करणे बंधनकारक आहे. परंतु, सदर प्रतिनियुक्ती करताना शासनाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे तपासणी करण्यात आली नाही. कोणत्याही परिस्थितीत प्रतिनियुक्तीकरिता संबंधित अधिकारी यांची नावाने मागणी करता येत नाही. त्यामुळे समाज कल्याण आयुक्तांनी दिनेश डोके यांच्या नावाने केलेली शिफारस नियमाला धरून नाही, असा आरोप  आहे.