लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : सिंहगड रस्ता भागात एका बंगल्यातून चंदनाचे झाड कापून नेणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून एक लाख रुपयांचे चंदनाची झाडाचे ओंडके जप्त करण्यात आले.

thane concrete piles on nitin company flyover threaten green belt and tree roots
ठाण्यातील महामार्गावरील दुभाजकामधील वृक्षांवर काँक्रीटचा थर, काँक्रीट थरामुळे हरित पट्टा धोक्यात येण्याची चिन्हे
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
parrot smuggler pune loksatta
पहाडी पोपटांची तस्करी केल्याप्रकरणी दोघांना अटक, न्यायालयीन कोठडीत रवानगी
kalyan forest officials arrested man from runde village for hunting peacock on saturday
कल्याणजवळील रूंदे गावात मोराची शिकार करणाऱ्या इसमास अटक
Thieves arrested after robbing motorist in Salisbury Park in Pune news
पुणे: सॅलिसबरी पार्कात मोटारचालकाला लुटणारे चोरटे गजाआड
Two wheeler thief arrested from rural area Pune print news
ग्रामीण भागातून दुचाकी चोरणारा गजाआड; वाशिममधील चोरट्याकडून ११ दुचाकी जप्त
sambar marathi news
सातारा: पाचगणीत आढळले दुर्मीळ पांढरे सांबर
Excavation in Boisar East Violation of quarry rules in excavation Palghar news
बोईसर पूर्वेला बेसुमार उत्खनन; खोदकामात खदानी नियमांचे उल्लंघन

भरत शिवाजी जाधव (वय ३४, रा. केडगाव चौफुला, गडदे वस्ती, ता. दैांड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. धायरी भागातील एका बंगल्याच्या आवारातील चंदनाचे झाड कापून नेण्यात आल्याची घटना नुकतीच घडली होती. सिंहगड रस्ता पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास करण्यात येत होता. वडगाव भागातील कॅनॉल रस्त्यावर एक जण थांबला असून, त्याच्याकडील पोत्यात चंदनाचे ओंडके असल्यााची माहिती गस्त घालणारे पोलीस कर्मचारी शिवाजी क्षीरसागर यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. त्याच्याकडील पोत्याची तपासणी करण्यात आली. तेव्हा पोत्यात चंदनाचे ओंडके सापडले.

आणखी वाचा-चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा ओढणीने गळा आवळून खून, नऱ्हे भागातील घटना

चंदन चोरटा जाधव याच्याविरुद्ध यापूर्वी यवत आणि हवेली पोलीस ठाण्यात चंदन चोरीचे गुन्हे दाखल झाले होते. पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिली दाईंगडे, गुन्हे शाखेचे निरीक्षक उत्तम भजनावळे, सहायक निरीक्षक सचिन निकम, उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, आबा उत्तेकर, संजय शिंदे, उत्तम तारु, अण्णा केकाण, अमोल पाटील, विनायक क्षीरसागर यांनी ही कारवाई केली.

Story img Loader