लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : विधी महाविद्यालय रस्त्यावर गस्त घालणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला करुन पसार झालेल्या चंदन चोरट्याला पोलिसांनी पकडले. पोलिसांनी स्वसंरणार्थ केलेल्या गोळीबारात दोन चोरटे जखमी झाले असून, पसार झालेल्या चोरट्यांचा पोलिसांकडून माग काढण्यात येत आहे.

Drunk driver hits police constable incident in Kalyaninagar area
मद्यपी वाहनचालकाकडून पोलीस शिपायाला धक्काबुक्की, कल्याणीनगर भागातील घटना
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…
fraud of 46 lakh with women by cyber thieves
पुणे : सायबर चोरट्यांकडून महिलांची ४६ लाखांची फसवणूक
Pune hit and run case
पुण्यात पुन्हा हिट अँड रन! रस्त्यावर फटाके फोडणाऱ्याला भरधाव कारने दिली धडक; ३५ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू
pune case against doctor
पुणे: गोळीबारातील जखमी चंदन चोरट्यांवर उपचार करणारे डॉक्टर गोत्यात, डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल करणार
Controversy over not serving kebabs on time Customer beaten by hotel owner
कबाब वेळेत न दिल्याने वाद; हॉटेल मालकाकडून ग्राहकाला मारहाण
Former corporator of NCP Ajit Pawar group Nana Kate will contest as an independent
पिंपरी : चिंचवडमध्ये महायुतीत बंडखोरी, अजितदादांच्या राष्ट्रवादीचे नाना काटे अपक्ष लढणार
stolen 1.5 lakh cash from Chitale brothers sweets shop During Diwali
दिवाळीत चितळे बंधू मिठाई विक्री दुकानात चोरी, गल्ल्यातील दीड लाखांची रोकड लंपास

आसिफ हरुनखान गोलवाल (वय २४, रा. जंजाळ, जिल्हा परिषद शाळेजवळ, ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात शाहरुख कादीरखान पठाण, फारुखखान कादीरखान पठाण (रा. जंजाळ, ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर) जखमी झाले आहेत. याप्रकरणी त्यांचे साथीदार नदीम खान लतीफ खान, फिरोज खान शरीफ खान, नजीम खान सादुखान यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २२ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री अडीचच्या सुमारास डेक्कन पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई महेश तांबे, गणेश सातव विधी महाविद्यालय रस्ता परिसरात गस्त घालत होते. अभिनव महाविद्यालय पथ परिसरातील जानकी व्हिला बंगल्याजवळ आरोपी गोलवाल आणि साथीदार अंधारात थांबले होते.

आणखी वाचा-कोथरूड विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाकडून माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांना उमेदवारी जाहीर

गस्त घालणारे पोलीस शिपाई तांबे आणि सातव यांनी अंधारात चोरट्यांची हालचाल पाहिली. संशय आल्याने त्यांनी अंधारात चोरट्यांचा शोध सुरू केला. बंगल्याच्या परिसरात दोन चोरटे थांबले होते. तांबे आणि सातव यांनी त्यांची चौकशी सुरू केली. तेव्हा त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा चोरट्यांनी त्यांच्या साथीदारांना हाक मारली. अंधारातून चोरटे तेथे आले आणि त्यांनी पोलीस शिपाई तांबे आणि सातव यांच्यावर करवतीने हल्ला चढविला. प्रसंगावधान राखून पोलीस शिपाई तांबे यांनी स्वसंरक्षणार्थ चोरट्यांच्या पायाच्या दिशेने पिस्तुलातून गोळीबार केला. पोलिसांशी झटापट करुन चोरटे अंधारात पसार झाले. तांत्रिक तपासात चोरटे छत्रपती संभाजीनगरकडे पसार झाल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर परिसरातील जंजाळ गावातून आरोपी गोलवाल याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याच्याबरोबर असलेले दोन साथीदार गोळीबारात जखमी झाल्याची माहिती मिळाली असून, चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे.

आणखी वाचा-चोरट्यांची शक्कल! भुयार खोदून १७ लाखांच्या तांब्याच्या तारा चोरी

पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त आयुक्त प्रवीणकुमार पाटील, उपायुक्त संदीपसिंग गिल, सहायक आयुक्त साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली डेक्कन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, सहायक निरीक्षक कवटीकर, उपनिरीक्षक महेश भोसले, अजय भोसले, शुभम देसाई, राहुल मखरे, शिंदे, धनश्री सुपेकर, दरेकर, साेनवणे, साबळे, सागर घाडगे, वसीम सिद्दीकी यांनी ही कारवाई केली.

Story img Loader