कोरेगाव पार्कमधील ओशो आश्रमातून चंदनाची दोन झाडे चोरट्यांनी कापून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत ओशो आश्रमातील सुरक्षारक्षक संतोष नामदास (वय ४२, रा. कोरेगाव पार्क) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हेही वाचा – पुणे : परिचारिकेचा विनयभंग करणाऱ्या डाॅक्टरविरुद्ध गुन्हा
हेही वाचा – भारतरत्न प्राप्त पुणेकरांच्या कुटुंबीयांचा सत्कार
ओशो आश्रामातील तीर्थ पार्क परिसरात मध्यरात्री चोरटे शिरले. चोरट्यांनी चंदनाची दोन झाडे करवतीच्या सहायाने कापून नेली. चंदनाची झाडे कापून नेल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर नामदास यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक धीरज कांबळे तपास करत आहेत.