scorecardresearch

Premium

पुण्यात गणपती मंडळाच्या सजावटीला आग, भाजपा अध्यक्ष नड्डांच्या हस्ते आरती सुरू असताना घडला प्रकार, पाहा VIDEO

पुण्यातील गणपती मंडळाच्या सजावटीला आग लागली आहे. याबाबतचा व्हिडीओ समोर आला आहे.

ganpati mandal catches fire
पुण्यात गणपती मंडळाच्या सजावटीला आग (फोटो सौजन्य-एएनआय)

पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात सध्या मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. पुण्यातील मानाच्या गणपतींसह इतर गणपती मंडळांच्या गणेशोत्सवासाठी केलेला देखावा पाहण्यासाठी राज्यभरातून भाविक पुण्यात दाखल होत आहेत. दरम्यान, पुण्यातील एका गणपती मंडळाच्या देखाव्याला आग लागली आहे. याबाबतचा एक व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

‘एएनआय’ने दिलेल्या वृत्तानुसार, पुण्यातील साने गुरुजी तरुण मित्र मंडळाच्या गणपतीच्या देखाव्याला आग लागली आहे. गणपतीसाठी तयार करण्यात आलेल्या सजावटीला आग लागली असून अगदी कळसापर्यंत आग पोहोचली आहे.

atmaklesh yatra for 22 day at the gates of sugar mills says raju shetty
कोल्हापूर :साखर कारखानांच्या दारात २२ दिवस आत्मक्लेश पदयात्रा; ७ नोव्हेंबरला ऊस परिषद – राजू शेट्टी
unique celebration of birth of girl child in the thergaon hospital
महापालिकेच्या थेरगाव रुग्णालयात मुलीच्या जन्माचे अनोखे स्वागत; बालिकेच्या ‘सुकन्या समृद्धी’ खात्यात डॉक्टरांकडून बचत
fire at Sane Guruji Mandal decoration
पुणे : साने गुरूजी मंडळाच्या देखाव्याच्या कळसाला किरकोळ आग; भाजपा अध्यक्ष नड्डा यांच्या हस्ते आरती सुरू असतानाच दुर्घटना
CCTV pune
गणेशोत्सवात १८०० ‘सीसीटीव्ही’ कॅमऱ्यांची पुण्यावर नजर

खरं तर, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे आज पुणे दौर्‍यावर होते.त्यावेळी पुणे शहराचे भाजपाचे अध्यक्ष धीरज घाटे यांनी साने गुरुजी तरुण मंडळाच्या आरतीसाठी नड्डा यांना आमंत्रित केलं होतं. यानंतर जे पी नड्डा हे आरतीसाठी दाखल झाले. दरम्यान, आरती सुरू झाल्यावर, देखाव्याच्या वरच्या बाजूला आग लागल्याची घटना घडली. ही घटना लक्षात येताच जे पी नड्डा यांना आरती अर्धवट सोडून बाहेर पडावे लागले. तर काही मिनिटात घटनास्थळी अग्निशामक विभागाचे कर्मचारी दाखल होऊन आग आटोक्यात आणली.

ही आग नेमकी कशामुळे लागली? याची पुष्टी अद्याप झाली नाही. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दीड मिनिटांच्या या व्हिडीओत गणपतीच्या स्टेजला आणि मंदिराप्रमाणे उभारलेल्या सजावटीला आग लागल्याचं दिसत आहे. आगीच्या घटनेनंतर गणेशभक्तांमध्ये गोंधळ निर्माण झाला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी गर्दी नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sane guruji tarun mitra mandal decoration catches fire in pune maharashtra viral video rmm

First published on: 26-09-2023 at 20:59 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×