पुणे : गृह विभागाने शुक्रवारी सायंकाळी पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश दिले. पुणे शहर, ग्रामीण पोलीस दल, तसेच पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. पुण्याचे सहपोलीस आयुक्त रंजनकुमा शर्मा यांची कोल्हापूर परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. सहपोलीस आयुक्तपदी संजय दराडे यांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तपदी तेजस्वी सातपुते यांची नियुक्ती करण्यात आली.

संजय दराडे हे कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक होते. त्यांची पुण्याच्या सहपोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तेजस्वी सातपुते या राज्य राखीव पोलीस दलात समादेशक होत्या. त्यांची पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेत अतिरिक्त पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. ठाणे पोलीस दलातील अतिरिक्त पोलीस आयुक्त एस. व्ही. पाठक यांची राज्य गुन्हे अन्वेषण विभागात (सीआयडी) बदली करण्यात आली. राज्य राखीव पोलीस दल, कोल्हापूर येथील समादेशक प्रशांत अमृतकर यांची पुणे पोलीस दलात उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. सोलापूर येथील उपायुक्त गौहर हसन यांची पुणे शहर पोलीस दलात उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जीवन बेनवाल यांची परभणी, जिंतूर येथून शहर पोलीस दलात उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अमरावती, अचलापूर येथून शुभम कुमार यांची पुणे ग्रामीण पोलीस दलात अतिरिक्त पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सीआयडी कार्यालयातील अधीक्षक पी. आर. पाटील यांची पुणे शहर पोलीस दलात उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नवी मुंबईतील उपायुक्त संजय पाटील यांची पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सांगलीतील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्राचार्य धीरज पाटील पिंपरी-चिंचवड पोलीस दलात उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. धाराशिव येथील अतिरिक्त अधीक्षक शफकत आमना यांची सीआयडी कार्यालयात नियुक्ती करण्यात आली आहे.

पुण्यातून बदलून गेलेले अधिकारी

रंजनकुमार शर्मा (सहपोलीस आयुक्त, पुणे ते विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र), शिवाजी पवार (पिंपरी-चिंचवड पोलीस उपायुक्त ते पोलीस उपायुक्त बृहन्मुंबई पोलीस दल ), रमेश चोपडे (अतिरिक्त पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण ते राज्य गुप्तवार्ता विभाग), विक्रम देशमुख (पोलीस अधीक्षक, महामार्ग सुरक्षा, ते पोलीस उपायुक्त, मीरा-भाईंदर-वसई-विरार), हिंमत जाधव (पुणे शहर ते पोलीस उपायुक्त बृहन्मुंबई पोलीस दल), जयंत मीना (अधीक्षक राज्य दहशतवाद विरोधी पथक ते बृहन्मुंबई पोलीस दल)

पदोन्नतीने बदली

एम. सी. व्ही महेश्वर रेड्डी (पोलीस अधीक्षक, सीआयडी ते उपमहानिरीक्षक, सीआयडी), विशाल गायकवाड (पोलीस उपायुक्त, पिंपरी-चिंचवड ते अतिरिक्त अधीक्षक, लोहमार्ग), रोहिदास पवार, (अतिरिक्त अधीक्षक, लोहमार्ग ते पोलीस उपायुक्त, पिंपरी-चिंचवड), पल्लवी बर्गे (सीआयडी ते पोलीस अधीक्षक, पोलीस दळणवळण, माहिती-तंत्रज्ञान विभाग), संभाजी कदम (पोलीस उपायुक्त, पुणे शहर ते पोलीस अधीक्षक, सीआयडी)