चौदा दिवसांच्या रजेमुळे संजय दत्त कारागृहातून बाहेर

मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेला अभिनेता संजय दत्त बुधवारी दुपारी मुंबईकडे रवाना झाला.

sanjay dutt, Bollywood, Mumbai blast, yerwada jail, Loksatta, Loksatta news, Marathi, Marathi news

मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेला अभिनेता संजय दत्त बुधवारी मुंबईकडे रवाना झाला. दुपारी तो मुंबईला आपल्या निवासस्थानी पोहोचला. संजय दत्तला कारागृह प्रशासनाने १४ दिवसांची अभिवाचन रजा (फर्लो) मंजूर केली आहे. कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर संजय दत्त कारागृहातून बाहेर पडला. येरवडा कारागृहाच्या मागील दरवाज्यातून तो बाहेर पडला आणि लगेचच मुंबईकडे रवाना झाला
सर्वोच्च न्यायालयाने संजय दत्तला पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. पैकी १८ महिने शिक्षा त्याने पूर्वी भोगली आहे. मे २०१३ पासून तो कारागृहात आहे. शिक्षेचा विशिष्ट कालावधी पूर्ण झाल्यानंतर कैद्याला १४ दिवसांची फर्लो रजा दिली जाते. त्यामध्ये आणखी १४ दिवस मुदतवाढ मिळू शकते. संजय दत्तने काही दिवसांपूर्वी फर्लो रजेसाठी कारागृह प्रशासनाकडे अर्ज केला होता. त्याची रजा मंजूर केल्याची माहिती येरवडा कारागृहाचे अधीक्षक योगेश देसाई यांनी दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sanjay dutt out from yerawada jail

ताज्या बातम्या