पुणे : बांधकाम व्यावसायिक युवराज ढमाले यांना जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी बांधकाम व्यावसायिक आणि माजी खासदार संजय काकडे यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. धमकी दिल्या प्रकरणी संजय काकडे आणि त्यांच्या पत्नी पत्नी उषा काकडे यांच्यवार गुन्हा दाखल आहे. त्यामधे आरोपी असलेल्या संजय काकडे आणि उषा काकडे यांना जामीन मंजूर केला होता. प्रकरण न्यायालयात प्रलंबित असताना आरोपी संजय काकडे न्यायालयीन कामकाजसाठी एकदाही हजर न राहता गैरहजेरी माफी मिळण्यासाठी अर्ज करत होते. या प्रकरणाच्या सुनावणी वेळी संजय काकडे यांच्या वतीने पुन्हा गैरहजेरी माफीसाठी अर्ज केला होता. तसेच फिर्यादी ढमाले यांनी संजय काकडे याना पकड वारंट काढण्याची विनंती अर्ज केला होता. त्यावर सुनावणी घेऊन केवळ शुक्रवारपुरती हजेरीची माफी देऊन आरोपी संजय काकडे यांना पुढील सुनावणीस न्यायालयात हजर राहण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायाधीश निमसे पुणे यांनी दिले.

Arvind kejriwal
अरविंद केजरीवाल यांची तुरुंगात इन्सुलिन देण्याची मागणी, न्यायालयात याचिका दाखल
supreme court on private hospitals bed
राखीव खाटांच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाकडून खासगी रुग्णालयांची कानउघडणी; म्हणाले, “ही रुग्णालये सरकारी अनुदान घेतात पण…”
Narayan Rane case, Vinayak Raut, Parab,
२००५ नारायण राणेंच्या सभेतील गोंधळाचे प्रकरण : विनायक राऊत, परब, सावंत, देसाई, रवींद्र वायकर यांची निर्दोष सुटका
kejriwal arrest
न्यायालयांचा केजरीवाल यांना पुन्हा धक्का; तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार ?