पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद जास्त असून ती जागा राष्ट्रवादी काँग्रेसलाच मिळायला हवी अशी आमची इच्छा असल्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे पुण्याच्या जागेचं त्रांगडं महाविकास आघाडीसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.

२०१९मध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होती. त्यामुळे त्यांच्यात झालेल्या जागावाटपानुसार ही जागा काँग्रेसकडे गेली होती. मात्र, काँग्रेसला या जागेवर सातत्याने पराभवाचा सामना करावा लागत असल्यामुळे ती जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावी, अशी मागणी अजित पवारांनी केली आहे. पण आता या दोन्ही पक्षांसोबत ठाकरे गटही या आघाडीत आहे. आणि या दोघांच्या वादामध्ये ठाकरे गटानं आपली भूमिका मांडली आहे.

jitendra awhad ajit pawar l
“नशीब त्यांनी डॉक्टरांना विषाचं इंजेक्शन…”, अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाडांचा टोला
वसंत मोरेंच्या प्रश्नावर राज ठाकरेंनी ‘अशी’ दिली प्रतिक्रिया, म्हणाले…
What Navneet Rana Said?
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर नवनीत राणांची पहिली प्रतिक्रिया, “मला माझी मुलं रोज विचारायची, आई…”
sanjay raut narendra modi
“रोज नवे जोक, देशात जॉनी लीवरनंतर…”, मेरठच्या सभेतील मोदींच्या ‘त्या’ वक्तव्यावरून संजय राऊतांचा टोला

पुण्याच्या जागेवरून मविआत खडाजंगी होणार? अजित पवार म्हणतात, “काँग्रेसनं काहीही म्हटलं, तरी…!”

संजय राऊत म्हणतात, “कसेल त्याची जमीन तत्वाने…”

संजय राऊतांनी पुण्याच्या जागेसंदर्भात केलेल्या ट्वीटमध्ये प्रत्येकानं थोडा थोडा त्याग करण्याचं आवाहन केलं आहे. “कसेल त्याची जमीन याप्रमाणे जो जिंकेल त्याची जागा हे सूत्र ठरले तर ‘कसबा’प्रमाणे पुणे लोकसभा पोटनिवडणूक महाविकास आघाडीला सहज जिंकता येईल. जागांचा आकडा वाढवण्याचा हट्ट अनाठायी आहे. जिंकेल त्याची जागा या सूत्राने महाराष्ट्र व देश जिंकता येईल. संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी प्रत्येकानं थोडा थोडा त्याग करावाच लागेल. जय महाराष्ट्र”, असं ट्वीट संजय राऊतांनी केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी अजित पवार, नाना पटोले आणि मल्लिकार्जुन खर्गे या तिघांना टॅग केलं आहे.

एकीकडे काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये पुण्याच्या जागेसाठी अहमहमिका लागलेली असताना दुसरीकडे त्याग करण्याचा सल्ला देणाऱ्या संजय राऊतांनीच ठाकरे गटाच्या १९ जागा कायम राहतील, अशी प्रतिक्रिया काही दिवसांपूर्वी घेतली होती. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या समन्वय समितीकडून कशा प्रकारे जागावाटपावर चर्चा होते, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.