दोन वर्षानंतर वारकऱ्यांच्या उपस्थितीत जगद्गुरु संत तुकोबांचा पालखी सोहळा पार पडणार आहे. देहूत ३२९ दिंड्या दाखल होणार आहेत. त्यामुळे मोठ्या संख्येने वारकरी देहूत येतील, असं विश्वस्त संजय महाराज मोरे व माणिक महाराज मोरे यांनी सांगितलं. पालखी प्रस्थान होताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते तुकोबांच्या पादुकांचे पूजन होईल. त्यानंतर दुपारी ठीक दोन वाजण्याच्या सुमारास संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या दोन वर्षांपासून करोनामुळे मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पार पडत होता. एसटीमधून महत्त्वाच्या व्यक्तींसोबत पालखी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवत असे. परंतु, यावर्षी करोना संख्या आटोक्यात असून कोणतेही निर्बंध नाहीत. त्यामुळं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी देहूत दाखल होत आहेत. दोन वर्षांच्या खंडानंतर पालखी सोहळा होत असल्याने वारकरी मोठ्या संख्येने दाखल होतील, असं विश्वस्त माणिक महाराज मोरे यांनी सांगितलं.

हेही वाचा : पालखी सोहळ्यासाठी चार हजार पोलिसांचा बंदोबस्त

जगतगुरू संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा-

  • २० जून २०२२ रोजी पहाटे ५ वाचता संत तुकाराम महाराज शिळा मंदिरात श्री विठ्ठल-रुखमाई महापूजा
  • पहाटे ६ वाजता वैकुंठस्थान श्री संत तुकाराम महाराज पूजा
  • सकाळी ७ वाजता तापोनिधी नारायण महाराज समाधी महापूजा, संस्थानचे अध्यक्ष, विश्वस्त, वंशज वारकरी यांच्या हस्ते
  • सकाळी १० ते १२ रामदास महाराज मोरे (देहूकर) यांचे पालखी प्रस्थान सोहळा काल्याचे कीर्तन
  • सकाळी ९ ते ११ इनामदार वाड्यात श्री संत तुकाराम महाराज पादुका पूजन
  • दुपारी २ वाजून ३० मिनिटाला पालखी प्रस्थान सोहळा
  • सायंकाळी ५ वाजता पालखी प्रदक्षिणा
  • सायंकाळी ६.३० वाजता इनामदार वाड्यात पालखी मुक्कामी, तेथेच मुख्य आरती
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sant tukaram maharaj palakhi sohala dehu pandharpur pune timetable 2022 kjp pbs
First published on: 19-06-2022 at 19:17 IST