Satara ZP Election Results LIVE Updates (सातारा जिल्हा परिषद निवडणूक निकाल): महाराष्ट्रातील यंदाच्या निवडणूक हंगामातील शेवटची निवडणूक जिल्हा परिषदेची ठरली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांनुसार राज्य निवडणूक आयोगाने आधी नगरपरिषद-नगरपंचायत, त्यानंतर महानगरपालिका आणि सरतेशेवटी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. विशेष म्हणजे आधी झालेल्या दोन्ही निवडणुकांमध्ये राज्यातील आघाड्या व युतींच्या अगदी उलट चित्र अनेक ठिकाणी दिसलं. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद निवडणुकांमध्येदेखील अनेक ठिकाणी राज्यातील मित्रपक्ष एकमेकांच्या विरोधात दंड थोपटून उभे राहिल्याचं दिसून आलं. सातारा जिल्हा परिषदेची निवडणूक त्यासाठी अपवाद नव्हती!
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार महाराष्ट्रातील ३४ जिल्हा परिषदांपैकी फक्त १२ जिल्हा परिषदा व एकूण १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका यंदा घेतल्या जात आहेत. या निवडणुकांसाठी एकीकडे राज्यात सत्तेत असणाऱ्या महायुतीमधील भाजपा, एकनाथ शिंदेंची शिवसेना व अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष कुठे एकमेकांसोबत तर कुठे एकमेकांच्या विरोधात उभे ठाकल्याचं दिसून आलं. दुसरीकडे विरोधकांचीदेखील काहीशी अशीच स्थिती पाहायला मिळाली.
सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक २०२६ वेळापत्रक (Satara ZP Election Schedule 2026)
महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांपैकी १२ जिल्हा परिषदांसाठी यंदा निवडणूक प्रक्रिया राबवली जात आहे. त्याअंतर्गत सातारा जिल्हा परिषद निवडणूक २०२६ साठी मतदानाचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीच्या वेळापत्रकानुसार ही निवडणूक ५ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार होती. मात्र, राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यभरात शोककळा पसरली. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने परिस्थितीचा आढावा घेत निवडणूक प्रक्रियेच्या वेळापत्रकात आवश्यक बदल केले.
त्यानुसार, सातारा जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतदान ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत पार पडले असून, मतमोजणी ९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या भावनिक वातावरणात पार पडलेल्या या निवडणुकीकडे राज्यभरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.
| निवडणूक टप्पा | तारीख / वेळ |
|---|---|
| सूचना प्रसिद्धी | १६ जानेवारी |
| नामनिर्देशन स्वीकारणे | १६ जानेवारी ते २१ जानेवारी |
| छाननी | २२ जानेवारी २०२६ |
| माघारीची अंतिम मुदत | २७ जानेवारी, दुपारी ३:०० पर्यंत |
| अंतिम उमेदवार यादी व चिन्ह वाटप | २७ जानेवारी, दुपारी ३:३० नंतर |
| मतदान | ७ फेब्रुवारी, सकाळी ७:३० ते संध्याकाळी ५:३० पर्यंत |
| मतमोजणी | ९ फेब्रुवारी, सकाळी १०:०० पासून |
सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती वॉर्ड संख्या (Satara Zila Parishad and Panchayat Samiti Wards Count)
सातारा जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा परिषदेचे ६५ निवडणूक विभाग आणि ११ पंचायत समित्या आहेत. या जिल्हा परिषदेच्या क्षेत्रात एकूण १३० पंचायत समिती वॉर्ड आहेत.
| माहिती | संख्या |
|---|---|
| जिल्हा परिषद एकूण वॉर्ड | ६५ |
| पंचायत समिती (सीट संख्या) | ११ |
| पंचायत समिती एकूण वॉर्ड | १३० |
Satara Zila Parishad Election Result 2017 – Party-wise Seats सातारा जिल्हा परिषद निवडणूक निकाल २०१७- पक्षनिहाय जागा
२०१७ साली या जिल्हा परिषदेच्या घेण्यात आलेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्ष ३९ जागांसह प्रथम क्रमांकावर होता. त्यापाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर ९ जागांसह इतर पक्षाची कामगिरी राहिली.
सातारा जिल्हा परिषदेचा विचार केला असता मागील म्हणजेच २०१७ साली झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) पक्षाला विजय मिळाला होता. निवडणुकीनंतर संजीव राजे नाइक यांची जिल्हा परिषद अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. तर उपाध्यक्ष पदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP)चे वसंतराव मनकुमारे यांनी बाजी मारली होती.
| पक्षाचे नाव | जिंकलेल्या जागा |
|---|---|
| राष्ट्रवादी | ३९ |
| इतर | ९ |
| भाजप | ७ |
| काँग्रेस | ७ |
| शिवसेना | २ |
| एकूण | ६४ |
सातारा जिल्हा परिषद वॉर्ड निहाय निकाल २०१७ (Satara Zilla Parishad Ward Wise Results 2017)
सातारा जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये एकूण ६५ निवडणूक विभाग असून २०१७ साली तेव्हाच्या राजकीय स्थितीचं प्रतिबिंब या जिल्ह्याच्या निकालांमध्ये पाहायला मिळालं.
| वॉर्ड क्रमांक | विजेत्याचे नाव | विजेत्या पक्षाचे नाव |
|---|---|---|
| ४४ | भाग्यश्री संजय मोहिते | सातारा विकास आघाडी |
| ६० | शंकर रघुनाथ खबाळे | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) |
| १ | उदय सदाशिव काबुले | स्वतंत्र |
| २ | दिपाली यशवंत साळुंखे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| ३ | मनोज जयवंत पवार | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| ४ | संजीव विजयसिंह नाईकनिंबाळकर | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| ५ | शिवांजली संजीवराजे नाईकनिंबाळकर | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| ६ | कांचन संभाजी निंबाळकर | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| ७ | उषादेवी विश्वास गावडे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| ८ | भावना माणिक सोनवलकर | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| ९ | जिजामाला रणजितसिंह नाईकनिंबाळकर | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) |
| १० | धैर्यशील धोंडिराम अनपट | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| ११ | बाबासो तुकाराम पवार | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| १२ | अरुण दादासो गोरे | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) |
| १३ | सोनाली मनोजकुमार पोळ | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| १४ | भारती संदीप पोळ | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| १५ | सुवर्णा अरुण देसाई | भारतीय जनता पक्ष (BJP) |
| १६ | सुनीता विजय कचरे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| १७ | प्रदीप बापुसो विधाते | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| १८ | कल्पना विजय खाडे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| १९ | शिवाजी दादा सर्वगोड | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| २० | सुनीता धैर्यशील कदम | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) |
| २१ | सुरेंद्र मोहनराव गुडगे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| २२ | मंगेश महादेव धुमाळ | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| २३ | अभय अनिरुद्ध तावरे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| २४ | जयश्री बाळासाहेब फाळके | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| २५ | जयवंत हणमंत भोसले | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| २६ | भीमराव परशराम पाटील | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) |
| २७ | रंजना संतोष डगळे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| २८ | शारदा अरविंद ननावरे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| २९ | संगीता महादेव मस्कर | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| ३० | प्रकाश दिनकर चव्हाण | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| ३१ | प्रणिता भरत जंगम | स्वतंत्र |
| ३२ | नीता संतोष आखाडे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| ३३ | वसंतराव ज्ञानदेव मानकुमरे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| ३४ | दीपक साहेबराव पवार | भारतीय जनता पक्ष (BJP) |
| ३५ | अर्चना ज्ञानदेव रांजणे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| ३६ | वनिता नारायण गोरे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| ३७ | प्रतीक आनंदराव कदम | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| ३८ | अनिता महेंद्र चोरगे | सातारा विकास आघाडी |
| ३९ | मधु कांतिलाल कांबळे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| ४० | रेश्मा संदीप शिंदे | भारतीय जनता पक्ष (BJP) |
| ४१ | सौरचना राहुल देशमुख | सातारा विकास आघाडी |
| ४२ | शिवाजी काशीनाथ चव्हाण | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| ४३ | कमल किसन जाधव | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| ४५ | मनोज भीमराव घोरपडे | भारतीय जनता पक्ष (BJP) |
| ४६ | बापू निवृत्ती जाधव | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| ४७ | संगीता बाळासो खबालेपाटील | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| ४८ | राजेश वसंत पवार | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| ४९ | विजय भाऊसो पवार | पाटण तालुका विकास आघाडी |
| ५० | सुग्रा बशीर खोंडू | शिवसेना (SHS) |
| ५१ | रमेश अण्णासाहेब पाटील | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| ५२ | आशिष बबन आचरे | शिवसेना (SHS) |
| ५३ | सुरेखा ज्ञानेश्वर जाधव | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| ५४ | वनिता संग्राम पलंगे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| ५५ | मानसिंगराव वसंतराव जगदाळे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| ५६ | निवास आत्माराम थोरात | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) |
| ५७ | प्रदीप जालिंदर पाटील | आघाडी |
| ५८ | सागर भीमराव शिवदास | भारतीय जनता पक्ष (BJP) |
| ५९ | मंगल बाळासो गलांडे | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) |
| ६१ | प्रियंका मधुकर थावरे | भारतीय जनता पक्ष (BJP) |
| ६२ | शंभळा बबन घोडके | भारतीय जनता पक्ष (BJP) |
| ६३ | गणपत हरिबा हुलवान | आघाडी |
| ६४ | उदयसिंह विलासराव पाटील | आघाडी |
सातारा जिल्हा परिषद वॉर्ड निहाय निकाल २०२६ (Satara ZP Ward Wise Election Results 2026)
सातारा जिल्हा परिषदेअंतर्गत एकूण ६५ जिल्हा परिषद प्रभाग आहेत. तसेच जिल्ह्यातील ११ पंचायत समित्यांमध्ये एकूण १३० प्रभागांचा समावेश आहे. २०११ च्या जनगणनेनुसार सातारा जिल्ह्याची एकूण लोकसंख्या ३,००३,७४१ इतकी आहे. २०२६ साली झालेल्या या निवडणुकांमधील सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रभागांचे सविस्तर निकाल येथे पाहता येतील.
महाराष्ट्रातील महत्वाचे जिल्हा परिषद निवडणुका निकाल २०२६ लाईव्ह अपडेट (Maharashtra Zilla Parishad Election Results 2026)
सातारा जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांची नावे
| क्रमांक | पंचायत समित्यांची नावे |
|---|---|
| १ | महाबळेश्वर पंचायत समिती |
| २ | वाई पंचायत समिती |
| ३ | खंडाळा पंचायत समिती |
| ४ | फलटण पंचायत समिती |
| ५ | माण पंचायत समिती |
| ६ | खटाव पंचायत समिती |
| ७ | कोरेगाव पंचायत समिती |
| ८ | सातारा पंचायत समिती |
| ९ | जावळी पंचायत समिती |
| १० | पाटण पंचायत समिती |
| ११ | कराड पंचायत समिती |
महाराष्ट्र जिल्हा परिषद २०२६ निवडणुकीशी संबंधित महत्त्वाचे प्रश्न-उत्तरे
प्र. सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुका कधी झाल्या?
उ. ७ फेब्रुवारी २०२६, सकाळी ७:३० ते संध्याकाळी ५:३० या वेळेत मतदान पार पडले.
प्र. सातारा जिल्हा परिषदेचे निकाल कधी जाहीर करण्यात आले?
उ. ९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजल्यापासून मतमोजणी व निकाल जाहीर करण्यात आले.
प्र. सातारा जिल्हा परिषदेची रचना कशी आहे? जिल्हा परिषद आणि पंचायत समिती स्तरावर किती निवडणूक विभाग आहेत?
उ. सातारा जिल्हा परिषदेत एकूण ६५ जिल्हा परिषद निवडणूक विभाग आहेत. जिल्ह्यात ११ पंचायत समित्या कार्यरत आहेत. या पंचायत समित्यांच्या कार्यक्षेत्रात एकूण १३० पंचायत समिती निवडणूक विभाग समाविष्ट आहेत. विशेष म्हणजे, पंचायत समितीच्या निवडणूक विभागांची संख्या जिल्हा परिषद निवडणूक विभागांच्या तुलनेत दुप्पट असते.
प्र. महापौरांची निवड कशी केली जाते?
उ. महापौरांची निवड निवडून आलेल्या नगरसेवकांमधून होते. बहुमत असणाऱ्या पक्षाचे उमेदवार महापौर व उपमहापौर होतात.
प्र. महाराष्ट्रात किती जिल्हा परिषदा आहेत?
उ. महाराष्ट्रात ३६ जिल्ह्यांमध्ये मिळून ३४ जिल्हा परिषदा आहेत.
प्र. महानगरपालिका निवडणुकांमध्ये मतदान करण्यासाठी कोण पात्र असतं?
उ. वयाची १८ वर्षे पूर्ण करणारे भारतीय नागरीक मतदानासाठी पात्र असतात.
प्र. जिल्हा परिषदेचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो?
उ. जिल्हा परिषदेचा कार्यकाळ ५ वर्षांचा असतो.
जिल्हा परिषद निवडणूक कार्यक्रम कोण जाहीर करतं?
उ. जिल्हा परिषद कार्यक्रम राज्य निवडणूक आयोग जाहीर करतं.
प्र. महाराष्ट्रात जिल्हा परिषद निवडणूक किती वेळा होतात?
उ. जिल्हा परिषदेच्या निवडणुकाही दर पाच वर्षांनी होतात.
प्र. जिल्हा परिषद निवडणुकीत कोणी मतदान करू शकतो?
उ. जिल्ह्यातील त्या प्रभागात नोंदणीकृत मतदार म्हणून नोंदणीकृत रहिवासी मतदानासाठी पात्र आहेत.
प्र. जिल्हा परिषद सदस्याची जबाबदारी काय आहे?
उ. जिल्हा परिषद सदस्य स्थानिक विकास प्रकल्प, कल्याणकारी योजना तसेच जिल्ह्यातील शाळा, रुग्णालये आणि ग्रामीण पायाभूत सुविधा यांचे प्रशासन आणि निर्णय घेण्याची जबाबदारी पार पाडतात.
प्र. जिल्हा परिषद अध्यक्षाची निवड कशी होते?
उ. वार्ड सदस्य निवडून आल्यावर, ते आपापसांत मतदान करून जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवड करतात.
प्र. जिल्हा परिषद निवडणुका कोण घेते?
उ. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग जिल्हा परिषद आणि इतर स्थानिक संस्थांसाठी स्वच्छ आणि स्वतंत्र निवडणुका घेण्यास जबाबदार आहे.
प्र. पंचायत समित्यांची सदस्य संख्या किती असते?
उ. महाराष्ट्रात पंचायत समित्यांची सदस्य संख्या त्या समितीच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या जिल्हा परिषद सदस्यांच्या संख्येच्या दुप्पट असते.
प्र. जिल्हा परिषद सदस्यांची संख्या किमान व कमाल किती असू शकते?
उ. कोणत्याही जिल्हा परिषद सदस्यांची संख्या किमान ५० ते कमाल ७५ असू शकते.
प्र. मतदारांना सातारा जिल्हा परिषदेचा निकाल कुठे पाहाता येईल?
उ. मतदारांना सातारा जिल्हा परिषदेचा निकाल निवडणूक आयोगाचे अधिकृत संकेतस्थळ व लोकसत्ता डॉट कॉमसारख्या विश्वासार्ह संकेतस्थळांवर पाहाता येईल.
डिस्क्लेमर: या पृष्ठावर नमूद करण्यात आलेली महाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणुकांसाठी निवडणूकविषयक माहिती विविध सार्वजनिक स्रोत, राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकृत अधिसूचना, माध्यमांतील अहवाल तसेच उपलब्ध आकडेवारीच्या आधारे संकलित करण्यात आली आहे. माहिती अचूक आणि अद्ययावत ठेवण्यासाठी सर्वतोपरी काळजी घेण्यात आली असली, तरी कालांतराने आकडे, निकाल किंवा इतर तपशीलांमध्ये बदल होण्याची शक्यता राहते. त्यामुळे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी वाचकांनी संबंधित अधिकृत स्रोतांची पडताळणी करणे आवश्यक आहे. या माहितीच्या आधारे घेतल्या जाणाऱ्या कोणत्याही निर्णयासाठी संकेतस्थळ किंवा प्रकाशक जबाबदार राहणार नाही.
