Sawai Gandharva Bhimsen Festival ticket sale from Saturday pune print news ysh 95 | Loksatta

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची शनिवारपासून तिकीटविक्री

आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेल्या ६८ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची तिकीटविक्री शनिवारपासून (३ डिसेंबर) सुरू होणार आहे.

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची शनिवारपासून तिकीटविक्री
सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव

पुणे: आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेल्या ६८ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची तिकीटविक्री शनिवारपासून (३ डिसेंबर) सुरू होणार आहे. मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडासंकुल येथे १४ ते १८ डिसेंबर या कालावधीत हा महोत्सव रंगणार आहे. भारतीय बैठक आणि खुर्चीची संपूर्ण महोत्सवाची तिकिटे उपलब्ध आहेत. यंदा दैनंदिन तिकिटे उपलब्ध नसतील, असे मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांच्या वतीने कळविण्यात आले आहे.

हेही वाचा >>> पुणे: अल्पसंख्याक मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेतून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना वगळले

शनिपार येथील बेहेरे आंबेवाले, कमला नेहरू पार्क येथील शिरीष ट्रेडर्स, कर्वे रस्ता येथील देसाई बंधू आणि सहकारनगर-अरणेश्वर येथील अभिरुची फूड्स या ठिकाणी महोत्सवांची तिकिटे शनिवारी सकाळी नऊ वाजल्यापासून उपलब्ध असतील. रसिकांना डेबिट व क्रेडिट कार्ड वापरूनही तिकिटे खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

हेही वाचा >>> भेटवस्तुच्या आमिषाने ज्येष्ठ महिलेचे अडीच लाखांचे दागिने लंपास; कात्रज भागातील घटना

विद्यार्थ्यांसाठी सीझन तिकीटाचा दर हा २५० रुपये असून हे तिकीट खरेदी करताना आणि महोत्सवाच्या ठिकाणी प्रवेश घेताना विद्यार्थ्यांनी छायाचित्र असलेले ओळखपत्र दाखविणे अनिवार्य आहे. महोत्सवाची ऑनलाईन तिकिटे www.esawai.com या संकेतस्थळावर शनिवारी सकाळी नऊ वाजल्यापासून उपलब्ध असतील.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-11-2022 at 17:42 IST
Next Story
पुणे: आदेशाचा भंग केल्या प्रकरणी अडीच हजार रिक्षाचालकांवर गुन्हा; बाइक टॅक्सी सेवेच्या विरोधात रिक्षाचालकांचे आंदोलन