पुणे: नामांकित उपहारागृहातील थाळी पडली एक लाखाला, एका थाळीवर एक थाळी मोफत देण्याच्या आमिषाने ऑनलाइन गंडा | Scam online with the lure of one plate free on one plate from a reputed restaurant pune print news rbk 25 amy 95 | Loksatta

पुणे: नामांकित उपहारागृहातील थाळी पडली एक लाखाला, एका थाळीवर एक थाळी मोफत देण्याच्या आमिषाने ऑनलाइन गंडा

डेक्कन जिमखाना भागातील एका नामांकित उपहारगृहाकडून एका थाळीवर आणखी एक थाळी मोफत देण्याची बतावणी करुन सायबर चोरट्याने एकास एक लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

पुणे: नामांकित उपहारागृहातील थाळी पडली एक लाखाला, एका थाळीवर एक थाळी मोफत देण्याच्या आमिषाने ऑनलाइन गंडा
एका थाळीवर एक थाळी मोफत देण्याच्या आमिषाने ऑनलाइन गंडा (प्रातिनिधिक छायाचित्र)

डेक्कन जिमखाना भागातील एका नामांकित उपहारगृहाकडून एका थाळीवर आणखी एक थाळी मोफत देण्याची बतावणी करुन सायबर चोरट्याने एकास एक लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.याबाबत एकाने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी सायबर चोरट्याच्या विरोधात पोलिसांनी माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार विश्रांतवाडी भागात राहायला आहे.

हेही वाचा >>>धक्कादायक: जेवणात मीठ कमी झालं म्हणून ढाबा चालकाने आचाऱ्याचा केला खून; पुण्यातील चाकण परिसरातील घटना

डेक्कन जिमखाना भागातील एका नामांकित उपाहारगृहाकडून ग्राहकांना एका थाळीवर एक थाळी मोफत देण्यात येणार असल्याची जाहिरात सायबर चोरट्याने समाजमाध्यमावर प्रसारित केली होती. तक्रारदाराच्या पत्नीने समाजमाध्यमावर ही जाहिरात पाहिली. समाजमाध्यमात प्रसारित करण्यात आलेल्या जाहिरातीत एक लिंक पाठविण्यात आली होती. चोरट्यांनी पाठवलेली लिंक तक्रारदाराच्या पत्नीने उघडली. चोरट्याने लिंकवर डेबिट कार्डची माहिती भरण्यास सांगितले होते.

हेही वाचा >>>वसंत मोरे यांची नाराजी आता तरी दूर होणार का? पुणे दौऱ्यादरम्यान अमित ठाकरेंकडून वसंत मोरेंना भेटीचे निमंत्रण

त्यानंतर चोरट्यांनी बँक खात्याची गोपनीय माहितीचा गैरवापर करुन तक्रारदाराच्या बँक खात्यातून एक लाख ७२२ रुपये लांबविले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सायबर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे तपास करत आहेत.यापूर्वी डेक्कन जिमखाना भागातील नामांकित हाॅटेलच्या नावे समाजमाध्यमावर बनावट जाहिरात प्रसारित करुन सायबर चोरट्यांनी गंडा घातला होता.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-12-2022 at 14:47 IST
Next Story
धक्कादायक: जेवणात मीठ कमी झालं म्हणून ढाबा चालकाने आचाऱ्याचा केला खून; पुण्यातील चाकण परिसरातील घटना