scorecardresearch

सायबेजखुशबूतर्फे गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

सामाजिक कामे करणारी व शिक्षणातून सामथ्र्य या संकल्पनेवर आधारित उपक्रम राबवणारी संस्था आहे

सायबेजखुशबूतर्फे यंदाही पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना एकूण एक कोटी ५५ लाख रुपयांच्या शिष्यवृत्ती दिल्या जाणार आहेत. संस्थेने आतापर्यंत ६५० विद्यार्थ्यांना शिष्यवृती दिली आहे आणि यंदाच्या शिष्यवृत्तीसाठी १६० गुणवंत विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतील.
सायबेजखुशबू ही सायबेज सॉफ्टवेअर कंपनीची सामाजिक कामे करणारी व शिक्षणातून सामथ्र्य या संकल्पनेवर आधारित उपक्रम राबवणारी संस्था आहे. गरजू, गरीब आणि पात्र विद्यार्थ्यांना त्यांची शैक्षणिक स्वप्ने पूर्ण करण्यासाठी ट्रस्टतर्फे सन २०१० पासून सातत्याने साहाय्य केले जात आहे. यंदाही सामाजिक व आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातील गरजू आणि गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृती देण्यात येणार आहे. प्रामुख्याने अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि संबंधित अभ्यासक्रमासाठी (बीई, डिप्लोमा, बीसीए, एमसीए, बीबीए, आíकटेक्चर, फार्मसी, नìसग, होमिओपॅथी, फिजिओथेरेपी) शिक्षणासाठी संस्था शिष्यवृत्ती देते.
संस्थेची संचालिका रितू नथानी म्हणाल्या, की ‘सायबेजखुशबू संस्थेचा असा विश्वास आहे की शिक्षण हेच असे माध्यम आहे की ज्यामुळे देशातील आíथक विषमता कमी होऊ शकेल. आमचा उद्देश गरजू ,गरीब आणि पात्र विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक साहाय्य करून त्यांना शिक्षणासाठी साहाय्य करणे हा आहे. आर्थिक मदतीबरोबर संस्था विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी संवाद कौशल्य, मुलाखत कौशल्य, भाषिक कौशल्य आणि सादरीकरण कौशल्य यांसारख्या आवश्यक कौशल्य विकासावर लक्ष केंद्रित करते. या योजनेला विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच पुणे विद्यार्थी गृह आणि विश्वकर्मा इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी यांसारखी महाविद्यालये आणि आय-टेक सारख्या संस्थांबरोबर काम करताना अनेक विविध गरजू विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही पोहोचू शकलो.
ज्या विद्यार्थ्यांना दहावी, बारावीच्या परीक्षेत ६० टक्क्यांपेक्षा अधिक गुण आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे आíथक वार्षकि उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे असे विद्यार्थी या शिष्यवृत्ती साठी अर्ज करू शकतात. या शिष्यवृत्तीसाठीचे अर्ज पुढील िलक वर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. http://www.cybage.com/company/responsible-business>

अर्ज मिळण्याचे ठिकाण
अर्ज सिक्युरिटी केबिन ऑफ सायबेज सॉफ्टवेअर प्रा. लि., सर्वेक्षण क्रमांक १३ ए गोल्ड अ‍ॅडलॅब्ज जवळ, डी मार्ट समोर, कल्याणीनगर, पुणे- १४, (दूरभाष: ६६०४१७००, विस्तारित क्रमांक ६०००) मिळणार असून ३० जूनपर्यंत अर्ज करायचे आहेत.संपर्क – मंदार पोफळे ७७२२०९१२३१ किंवा प्रशांत महामुनी ९६५७७०२९०७ .

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Scholarships for needy students

ताज्या बातम्या