scorecardresearch

पुणे : बॅडमिंटनचे फूल काढताना वीजवाहिनीच्या धक्क्याने शाळकरी मुलीचा मृत्यू

लोणी काळभोर पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.

पुणे : बॅडमिंटनचे फूल काढताना वीजवाहिनीच्या धक्क्याने शाळकरी मुलीचा मृत्यू
प्रतिनिधिक छायाचित्र photo source : लोकसत्ता ग्राफिक्स टीम

घराच्या गच्चीवर बॅडमिंटन खेळताना पडलेले फूल काढताना वीजवाहिनीचा धक्का बसून दहा वर्षांच्या शाळकरी मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना लोणीकाळभोर भागात घडली.

भाग्यश्री धनाजी बनसोडे (वय १०) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे. दोन दिवसांपूर्वी भाग्यश्री घराच्या गच्चीवर बॅडमिंटन खेळत होती. त्यावेळी बॅडमिंटनचे फूल गच्चीच्या दुसऱ्या बाजूला पडले. तिने शिडीवर चढून फूल काढण्याचा प्रयत्न केला. गच्चीवरुन जाणाऱ्या उच्च क्षमतेच्या वीजवाहिनीचा धक्का बसून भाग्यश्री होरपळली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हेही वाचा >>>पुण्यात सोमवारी ‘हॉर्न बंद’

उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याची माहिती लोणी काळभोर पोलिसांनी दिली. दरम्यान, भाग्यश्रीचा मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात शोककळा पसरली आहे. लोणी काळभोर पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 10:23 IST

संबंधित बातम्या