scorecardresearch

धमकी देऊन शाळकरी मुलीवर बलात्कार; पुण्यातील धक्कादायक घटना

पुण्यात एका शाळकरी मुलीला धमकी देऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे.

delhi crime minor rape
प्रातिनिधीक फोटो

पुण्यातील चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस आहे. येथील एका शाळकरी मुलीला धमकी देऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे. पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईनं चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

विशाल पिराजी शिकरे असं अटक करण्यात आलेल्या २० वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो खराडी परिसरातील रहिवासी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी विशाल हा पीडित मुलीच्या कुटुंबीयांचा ओळखीचा आहे. तो त्यांच्याकडे अनेकदा यायचा. दरम्यान आरोपी विशालने पीडित मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला.

तसेच या प्रकाराची कोणाला माहिती दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही आरोपीनं पीडित मुलीला दिली. पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी केली असता ती गर्भवती राहिल्याचे उघडकीस आलं आहे. यानंतर मुलीच्या आईने चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मुळूक करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: School girl raped by threatening in pune print news rmm