पुणे : नात्यातील एका मुलीला गुंगीचे ओैषध असलेले इंजेक्शन देऊन तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी एका तरुणाला अटक केली असून आरोपी मुलीच्या नात्यातील आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. आरोपी २१ वर्षीय तरुण मुलीच्या नात्यातील आहे.

हेही वाचा >>> पुणे : सीए तरुणीच्या मृत्यूवर ईवाय इंडियाचे अध्यक्ष राजीव मेमानी मौन सोडून म्हणाले की,…

EY toxic culture controversy ashneer grover
Ashneer Grover EY story: “एक कोटी पगार; तरीही पहिल्याच दिवशी पळालो” अशनीर ग्रोवरनं सांगितला EY कंपनीतील धक्कादायक अनुभव
Shantanu Naidu ratan tata youngest friend
कोण आहे ३० वर्षांचा पुणेकर शांतनू नायडू? त्याची…
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
IPS Shivdeep Lande Resign
IPS Shivdeep Lande Resign : आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांचा तडकाफडकी राजीनामा; कारण काय?
EY India has denied allegations of "work pressure" after Anna Perayil's mother made the claims
EY Employee Death : कामाच्या अतिताणामुळे मृत्यू झालेल्या ॲनाच्या वडिलांची प्रतिक्रिया; म्हणाले, “ती रात्री साडेबारापर्यंत…”
Akshay Shinde Encounter Case Bombay High Court Hearing Updates in Marathi
Mumbai High Court on Akshay Shinde Encounter Case : “अक्षयने पिस्तुल लोड कशी केली? मी १०० वेळा…”, उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी पोलीस आणि सरकारी वकिलांना सुनावलं!
TC Ashish Pande Suspended
Ashish Pande : “मराठी माणसाला एक रुपयाचा बिझनेस देणार नाही”, म्हणणाऱ्या टीसी आशिष पांडेचं रेल्वेने केलं निलंबन
Nitin Gadkari
Nitin Gadkari : १९०० कोटींमध्ये रस्ता बांधून ८००० कोटी टोल का वसूल केला? नितीन गडकरींना थेट प्रश्न, हिशेब सांगत म्हणाले…

मुलीच्या दंडावर गुंगीचे ओैषध असलेले इंजेक्शन आरोपीने दिले. मुलगी बेशुद्ध पडल्यानंतर तिची छायाचित्रे काढली. समाज माध्यमात छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी देऊन आरोपीने तिच्यावर अत्याचार केले. संबंधित प्रकाराची कोणाला माहिती दिल्यास धमकी दिली. मी जेव्हा भेटायला बोलावेल. तेव्हा यायचे, अशी धमकी आरोपीने मुलीला दिल्याचे तिच्या आईने फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक काळे तपास करत आहेत.

हेही वाचा >>> पुणे : शहरात चंदन चोरट्यांचा धुमाकूळ- लष्करी अधिकाऱ्याच्या बंगल्यात चंदन चोरी

बारामतीतील दोन मुलींना पुण्यात बोलावून त्यांच्यावर सामुहिक अत्याचार करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली होती. याप्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी तिघांना अटक केली होती. अखेर वाचा फुटली… पीडीत मुलगी एका शाळेत शिक्षण घेत आहे. आरोपी मुलीच्या नात्यातील आहे. याप्रकाराची माहिती वडिलांना दिल्यास ते चिडतील. वाद होतील. त्यामुळे मुलीने या प्रकाराची माहिती कुटुंबीयांना दिली नव्हती. अत्याचारांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध शाळांमध्ये तक्रार पेट्या बसविण्यात आल्या आहेत. मुलीने तिच्यावर गुदरलेल्या प्रसंगाची माहिती अर्जात लिहिली होती. मुलीने तक्रार पेटीत अर्ज टाकला. शालेय प्रशासनाने तिचा अर्ज पाहिला. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी मुलीच्या नात्यातील २१ वर्षीय तरुणाला अटक केली असून, त्याच्याविरुद्ध बलात्कार, तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल केला.