शाळेत झालेल्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी अल्पवयीन मुले तसेच त्यांच्या बरोबर असलेल्या साथीदारांनी दहशत माजवल्याची घटना सिंहगड रस्ता भागात घडली. टोळक्यातील मुलांनी एका महिलेवर कोयता उगारून जीवे मारण्याची धमकी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याबाबत जयश्री योगेश तारु (वय ३५, रा. राधिका सोसायटी, वडगाव बुद्रुक) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अल्पवयीन मुले तसेच त्यांच्या बरोबर असलेल्या साथीदारां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तारु यांचा मासे विक्रीचे व्यवसाय असून वडगाव उड्डाण पुलाजवळ त्यांचे दुकान आहे. तारु यांचा लहान मुलगा सिद्धार्थ याची गुन्हा दाखल करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलांशी तीन महिन्यांपूर्वी शाळेत भांडणे झाली होती. या कारणावरुन अल्पवयीन मुले आणि साथीदार सिद्धार्थवर चिडले होते. तारु आणि त्यांचा मुलगा रोहित मासेे विक्री दुकानात थांबले होते. त्या वेळी अल्पवयीन मुले आणि साथीदार दुकानात आले. त्यांनी तारु यांचा मोठा मुलगा रोहित याला जीवे मारण्याची धमकी दिली. तारु यांच्या दुकानाबाहेर बसलेल्या भाजी विक्रेत्यांना कोयत्याचा धाक दाखवून दहशत माजविली. जीवे मारण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुले पसार झाली. सहायक पोलीस निरीक्षक कादबाने तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: School riots crime against minors threatening woman machete sinhagad road police amy
First published on: 16-05-2022 at 16:04 IST