मुंबई- पुणे एक्स्प्रेसवेवर कारची टँकरला धडक, तीन ठार

किवळे पुलावर भरधाव कारने अज्ञात वाहनाला धडक दिली

 

मुंबई- पुणे एक्स्प्रेसवेवर अपघातांचे सत्र सुरुच असून शनिवारी दुपारी कारने टँकरला धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला असून खालापूरमधील फूडमॉल येथे हा अपघात झाला.

पनवेलमध्ये राहणारे कुमार ओसवाल यांचा व्यवसाय असून शनिवारी दुपारी कुमार ओसवाल हे पत्नी विमला देवी आणि मुलगी निशासह पुण्यातून पनवेलकडे येत होते. खालापूरजवळील फूडमॉलजवळ ओसवाल यांच्या भरधाव कारने समोरील टँकरला धडक दिली. यात ओसवाल कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला.

शनिवारी दिवसभरात एक्स्प्रेस वेवरील हा दुसरा अपघात आहे. किवळे पुलावर भरधाव कारने अज्ञात वाहनाला धडक दिली. यात कारमधील एकाचा मृत्यू झाला. तर ३ जण जखमी झाले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Second accident in day on mumbai pune express way near khalapur car crash water tanker 3 killed

ताज्या बातम्या