आरटीईच्या प्रवेशांसाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ

प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे राज्यात आरटीईची प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

आता प्रवेशाठी २३ जुलैची मुदत

पुणे : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) खासगी शाळांतील २५ टक्के  राखीव जागांवरील प्रवेशासाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. आता प्रवेशासाठी २३ जुलैची मुदत देण्यात आली आहे. शुक्रवार सायंकाळपर्यंत ९६ हजार ६८४ जागांपैकी ४५ हजार ८५८ विद्यार्थ्यांचेच प्रवेश निश्चित झाले होते.

प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे राज्यात आरटीईची प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. राज्यभरातील ९ हजार ४३२ शाळांमध्ये यंदा ९६ हजार ६८४ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. मार्चमध्ये जाहीर केलेल्या सोडतीमध्ये ८२ हजार १२९ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर करण्यात आले. मात्र प्रवेशांसाठी ११ जून ते ३० जूनदरम्यान प्रक्रिया राबवण्यात आली. मात्र या कालावधीत सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेश न झाल्याने ९ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. मात्र गटशिक्षणाधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांच्या स्तरावरून निवड यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले नसल्यामुळे निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी, गटशिक्षणाधिका?ऱ्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठी २३ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय प्राथमिक शिक्षण संचालनालयाने घेतला.

अद्यापही ज्या पालकांनी प्रवेशासाठी शाळेशी संपर्क साधलेला नाही किं वा ज्या पालकांना अद्यापही सोडतीमध्ये प्रवेश मिळाल्याचे कळलेले नाही, त्यांना लघुसंदेश पाठवून प्रवेश घेण्याबाबत कळवण्याच्या सूचना प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी शिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Second extension for rte admission akp

Next Story
अनलजित सिंग
ताज्या बातम्या