scorecardresearch

पुणे: भरधाव वाहनाच्या धडकेने सायकलस्वार ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

अपघातानंतर पसार झालेल्या वाहनचालकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

accident death
अपघातात गंभीर जखमी झालेल्या पाटोळे यांचा उपचारादरम्यान मृत्यू (फोटो सौजन्य- प्रातिनिधिक छायाचित्र)

पुणे: भरधाव वाहनाच्या धडकेने सायकलस्वार ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना घोरपडी गाव परिसरात घडली. अपघातानंतर पसार झालेल्या वाहनचालकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामदास केशव पाटोळे (वय ६५, रा. कासेवाडी, भवानी पेठ) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत कैलास पाटोळे (वय ५८, रा. कासेवाडी, भवानी पेठ) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रामदास पाटोळे सायकलवरुन घोरपडी गाव परिसरातील व्हिक्टोरिया रस्त्याने निघाले होते. त्या वेळी भरधाव वाहनाने सायकलस्वार पाटोळे यांना धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या पाटोळे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पसार झालेल्या वाहनचालकाचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत असून पोलीस उपनिरीक्षक प्रवीण खरवडे तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-03-2023 at 18:18 IST

संबंधित बातम्या