पुणे : ज्येष्ठाकडून रूग्णालयातील कर्मचारी तरुणीचा विनयभंग करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी एका ज्येष्ठाविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
याबाबत एका तरुणीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी एका ७३ वर्षीय ज्येष्ठाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी मध्यभागातील एका खासगी रुग्णालयात रिसेप्शनिस्ट आहे. ३ जुलै रोजी ज्येष्ठ रुग्णालयात आला होता. त्या वेळी तरुणी एकटीच रुग्णालयात होती. तरुणी एकटी असल्याची संधी साधून ज्येष्ठाने तिच्याशी अश्लील वर्तन केले. ज्येष्ठाने अश्लील वर्तन केल्याने तरुणी घाबरली. ती क्लिनिकमधून बाहेर पळाली. त्यानंतर ज्येष्ठाने तिला गाठले. ‘उद्या क्लिनिकमध्ये आहे का ?’, अशी विचारणा केली. या घटनेनंतर घाबरलेल्या तरुणीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली.
तरुणीचा विनयभंग करणे, तसेच मानसिक त्रास दिल्याप्रकरणी ज्येष्ठाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी रुग्णालयाच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेेले चित्रीकरण तपासले असून, पाेलीस उपनिरीक्षक पाटील तपास करत आहेत.