scorecardresearch

पुणे : वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वाती देसाई यांचे निधन

देसाई मुळच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गणेशवाडी गावच्या रहिवासी होत्या

पुणे : वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वाती देसाई यांचे निधन
वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वाती देसाई

पुणे पोलीस आयुक्तालयातील परकीय नागरिक नोंदणी (एफआरओ) विभागात कार्यरत असलेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वाती देसाई (वय ५०) यांचे रविवारी मध्यरात्री अल्पशा आजाराने निधन झाले.देसाई मुळच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गणेशवाडी गावच्या रहिवासी होत्या. गेले २५ वर्ष त्या पोलीस दलात कार्यरत होत्या.

हेही वाचा >>> पुणे : हडपसर भागातून बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह विहिरीत सापडला

सहकारनगर पोलीस ठाण्याच्या त्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक होत्या. त्यांची सहा महिन्यांपूर्वी विशेष शाखेतील परकीय नागरिक नोंदणी विभागात बदली झाली होती. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी हाेत्या. उपचारादरम्यान रविवारी मध्यरात्री खासगी रुग्णालयात त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले.देसाई यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या