scorecardresearch

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुमित्रा भांडारी यांचे निधन, वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुमित्रा माधव भांडारी (६० वर्षे) यांचे अल्पशा आजाराने पुणे येथे निधन झाले.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुमित्रा भांडारी यांचे निधन, वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार
लोकसत्ता टीम

पुणे : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुमित्रा माधव भांडारी (६० वर्षे) यांचे अल्पशा आजाराने पुणे येथे निधन झाले. बुधवारी वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुमित्रा भांडारी या मूळच्या परभणी येथील होत्या. पूर्वाश्रमीच्या त्या वासंती वेलणकर होत्या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक कै. नानासाहेब वेलणकर यांच्या त्या कन्या, तर भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते माधव भांडारी यांच्या पत्नी होत्या. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय संघटनमंत्री व्ही. सतीश आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक डॉ. गिरीश वेलणकर यांच्या त्या बहीण होत्या.

हेही वाचा – डीएल.एड., सीटीईटी एकाच वेळी; डीएल.एड. परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी

सुमित्रा भांडारी यांनी विद्यार्थी दशेत परभणीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थी चळवळीचे नेतृत्व केले होते. विवाहानंतर त्या पुणे आणि कोकण विभागातील विविध सामाजिक संघटना आणि संस्थांमध्ये सक्रिय होत्या.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-01-2023 at 12:34 IST

संबंधित बातम्या