ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोतापल्लेंची प्रकृती चिंताजनक; पुण्यात उपचार सुरू|senior writer dr. nagnath kotapalle condition is critical treatment started in pune | Loksatta

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोतापल्लेंची प्रकृती चिंताजनक; पुण्यात उपचार सुरू

कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन सून शिल्पा कोत्तापल्ले यांनी लोकसत्ता ऑनलाइनशी बोलताना केले आहे.

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोतापल्लेंची प्रकृती चिंताजनक; पुण्यात उपचार सुरू
संग्रहित छायाचित्र / लोकसत्ता

पुणे : जेष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एक वर्षापूर्वी त्यांना कॅन्सरचे निदान झाले होते . तेव्हापासून पिंपरी- चिंचवडच्या राहत्या घरी सून आणि मुलगा त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून होते. परंतु, गेल्या १५ दिवसांपूर्वी डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तात्काळ पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असून कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन सून शिल्पा कोत्तापल्ले यांनी लोकसत्ता ऑनलाइनशी बोलताना केले आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-11-2022 at 12:20 IST
Next Story
पुणे: गुन्हे शाखेतील लाचखोर पोलीस कर्मचाऱ्यासह दोघांना पकडले