आकर्षक नावे आणि लक्ष्यवेधी जाहिराती करून प्रेक्षकांना आकृष्ट करणाऱ्या नाटकांच्या लाटेला चाप बसवण्यासाठी सध्याच्या रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाने (नाटकांचे सेन्सॉर बोर्ड) ‘अॅग्रेसिव्ह’ या नाटकातील काही संवादांना आक्षेप घेतला आहे. हे संवाद वगळूनच नाटकाचे प्रयोग करण्याचे आदेश परिनिरीक्षण मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत देण्यात आले. यापूर्वीच्या मंडळाने प्रयोग करण्यास परवानगी दिल्याने हे नाटक रंगभूमीवर सुरू आहे. मंडळाचे सदस्य बदलल्याने मंडळाचा प्रत्येक नाटकाकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलणार का, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
कोणतेही नाटक रंगभूमीवर आणण्यापूर्वी परिनिरीक्षण मंडळाला संहिता सादर करावी लागते. त्यानंतर मंडळाच्या अध्यक्षांच्या सहीचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच ते नाटक रंगभूमीवर सादर करता येऊ शकते. मात्र मंडळाला नाटकाचे प्रयोग थांबवण्याचे अधिकार नसल्याचे मत मंडळाचे माजी सदस्य सुनील महाजन यांनी व्यक्त केले आहे.
ला परवानगी देणाऱ्या रंगभूमी प्रयोग परीनिरीक्षण मंडळाने म्हणजेच सेन्सॉर बोर्डाने त्याच नाटकाच्या प्रयोगातील काही संवादांना आक्षेप घेतला आहे. हे संवाद काढून टाकण्याची सूचनावजा तंबी दिली असून तोपर्यंत नाटय़प्रयोग थांबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे ‘अॅग्रेसिव्ह’ झालेल्या मंडळाच्या भूमिकेविषयीच ‘संशयकल्लोळ’ निर्माण झाला आहे. तर, नाटकाचे प्रयोग थांबविण्याचे कोणतेही अधिकार मंडळाला नाहीत, याकडे मंडळाच्या माजी सदस्याने लक्ष वेधले आहे.
मंडळाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ रंगकर्मी राम जाधव यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या मंडळाच्या बैठकीला ३३ पैकी २७ सभासद उपस्थित होते. लक्षवेधक नावे, आकर्षक जाहिरातींच्या माध्यमातून प्रेक्षकांना आकर्षित करीत रंगभूमीवर सादर होणाऱ्या नाटकांची आलेली लाट या विषयावर बैठकीमध्ये चर्चा झाली. मंडळाने या नाटकांतील आक्षेपार्ह भागासंबंधातील सूचना मागविल्या होत्या. ही चर्चा होत असताना संबंधित नाटकांचे लेखक, निर्माते, दिग्दर्शक यांनाही निमंत्रित करण्यात आले होते. ज्या नाटकांविषयीचे आक्षेप नोंदविण्यात आले त्या नाटकांतून संबंधित संवाद वगळण्याच्या सूचनाही या वेळी देण्यात आल्या.
अॅग्रेसिव्ह नाटकातील काही संवादांसदर्भात मंडळाच्या महिला सदस्याने आक्षेप नोंदविले होते. त्यानंतर या नाटकातून ते संवाद काढून टाकण्यासंबंधी सुचविण्यात आले होते. मात्र, ठाणे येथे झालेल्या प्रयोगामध्ये हे संवाद जसेच्या तसे असल्याचे या सदस्याने बैठकीमध्ये निदर्शनास आणून दिले. त्यानंतर या नाटकाच्या प्रयोगाची परवानगी थांबविण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला, अशी माहिती मंडळाच्या एका सदस्याने दिली. मात्र, या नाटकाची संहिता मंडळाच्या दोन महिला सदस्यांनीच वाचून संमत केल्यानंतर मंडळाच्या अध्यक्षांची स्वाक्षरी असल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले होते. ही संहिता वाचून ‘फक्त प्रौढांसाठी’ अशा स्वरुपाची परवानगी या नाटकाला देण्यात यावी, अशी शिफारस या दोघींपैकी एकीने केली होती. त्यामुळे ज्या संहितेला मंडळाने परवानगी दिली आहे त्या नाटकाचे प्रयोग मंडळ कसे थांबवू शकते हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
रंगभूमी प्रयोग परीनिरीक्षण मंडळ नाटकातील आक्षेपार्ह भाग वगळण्यासंबददर्भात सूचना करू शकते. मात्र, नाटकाचे प्रयोग थांबविण्याचा अधिकार मंडळाला नाही, याकडे मंडळाचे १५ वर्षे सदस्य म्हणून काम केलेल्या सुनील महाजन यांनी लक्ष वेधले. मंडळाने यापूर्वी ‘मी नथूराम गोडसे बोलतोय’ या नाटकासंदर्भात आक्षेप घेतले होते. या विषयावर विधीमंडळातही चर्चा झाली होती. मात्र, एकदा परवानगी मिळालेल्या संहितेचे प्रयोग रोखता येणार नाहीत असे सांगत उच्च न्यायालयाने या नाटकाच्या प्रयोगाला परवानगी दिली होती. असाच प्रश्न मच्छिंद्र कांबळी यांच्या नाटकाच्या नावावरून उपस्थित झाला होता. मात्र, त्यावेळी नाटकाच्या नावामध्ये बदल करून कांबळी यांनी तडजोडीने हा प्रश्न निकाली काढला, असेही महाजन यांनी सांगितले.