लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे: मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर झालेल्या वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. नवले पूल आणि वारजे भागात हे अपघात झाले.

बाह्यवळण मार्गावर नवले पुलाजवळ असलेल्या स्वामी नारायण मंदिर परिसरात सेवा रस्त्यावर भरधाव वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. पहाटे चारच्या सुमारास ही घटना घडली. ठाकुर लखन कुशवाह (वय २८, रा. दत्तनगर) असे मृत्यूमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. याप्रकरणीवाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत राजेंद्र कुशवाह (वय ३२) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राजेंद्र यांचा भाऊ लखन पहाटे चारच्या सुमारास बाह्यवळण मार्गावरुन दुचाकीवरुन निघाला होता. पहाटे सेवा रस्त्यावर भरधाव वाहनाने दुचाकीस्वार लखनला धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या लखनचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला. पसार झालेल्या वाहनचालकाचा शोध घेण्यात येत असून पोलीस उपनिरीक्षक मोहन देशमुख तपास करत आहेत.

आणखी वाचा-पुणे: मेट्रोचे साहित्य चोरणाऱ्या तीन महिलांसह पाच जणांना अटक

बाह्यवळण मार्गावर वारजे भागात मालवाहू जीप (पिकअप) उलटून झालेल्या अपघातात चालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ओंकार दत्तात्रय पानसरे (वय २१, रा. साकोरी. ता. जुन्नर) असे मृत्यूमुखी पडलेल्या चालकाचे नाव आहे. याबाबत पोलीस कर्मचारी बालाजी काटे यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ओंकार पानसरे साताऱ्याकडे निघाला होता. त्या वेळी भरधाव पिकअप उलटून अपघात झाला. अपघातात गंभीर जखमी झालेल्या पानसरेचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक तृप्ती पाटील तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Series of accidents near navale bridge never ends two died in different accidents pune print news rbk 25 mrj
First published on: 06-06-2023 at 20:17 IST