पुण्यातील मुंढवा परिसरातील पिंगळे वस्ती येथे राहणार्‍या एका ८० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाच्या घरातील नोकराने  जेवणातून गुंगीचे  औषध देऊन २८६ ग्रॅम सोने आणि हिर्‍याचे दागिने काही ,रोख रक्कम अशी एकूण २३ लाख ९८ हजार रुपये किमतीची चोरीची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

विपीन हून आणि जसमीत हून या ज्येष्ठ नागरिकांच्या घरी चोरीची घटना घडली आहे. नरेश शंकर सौदा (वय २२) असे आरोपी नोकराचे  नाव आहे.

Udayanraje Bhosale
उदयनराजे यांच्या संपत्तीत चक्क २१ कोटी रुपयांची घट
Pimpri road, road development works,
पिंपरी : रस्ते विकासाच्या ९० कोटींच्या कामात ‘रिंग’?
bse listed companies marathi news
गुंतवणूकदार ४०० लाख कोटींचे धनी
2000 currency notes worth rs 8202 crore still in circulation
दोन हजारांच्या ८,२०२ कोटी रुपये मूल्याच्या नोटा आजही लोकांहाती!

हेही वाचा >>>पुणे : हस्ताक्षर चांगले नसल्याने शिक्षिकेकडून विद्यार्थ्याला मारहाण; शिक्षिकेच्या विरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंढवा येथील पिंगळे वस्ती येथील एका सोसायटीमध्ये विपीन हून आणि जसमीत हून हे राहण्यास आहेत. ते दोघेही ज्येष्ठ नागरिक असल्याने, घरातील कामासाठी महिन्याभरापूर्वी नरेश शंकर सौदा याला २४ तासांसाठी कामाला ठेवले होते. त्यामुळे आरोपी नरेश याला महिन्याभरात घरातील सर्व माहिती झाली होती. हे सर्व लक्षात घेऊन, आरोपी नरेश याने रविवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास विपीन हून आणि जसमीत हून, या दोघांना जेवण दिले.पण आरोपीने जेवणामध्ये गुंगीचे औषध टाकले होते. त्यामुळे दोघांना काही मिनिटात झोप लागली. त्यानंतर आरोपी नरेश याने कपाटामधील सोने, हिर्‍याचे दागिने (२८६ ग्रॅम वजनाचे दागिने) आणि काही रोख रक्कम अशी एकूण २३ लाख ९८ हजार रूपयांचा मुद्देमाल घेऊन आरोपी नरेश पसार झाला.

विपीन हून आणि जसमीत हून या दोघांना सकाळी जाग आल्यावर चोरी झाल्याचे  दिसून आले. त्यानंतर आमच्याकडे त्यांची मुलगी प्रिती हून यांनी फिर्याद देताच, आरोपी नरेश शंकर सौदा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास करण्यात येत असल्याचे मुंढवा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक शिवाजी काटे यांनी दिली.