scorecardresearch

पुणे: पिरंगुटजवळ टेम्पोची वाहनांना धडक; सात जण जखमी

घाटातील तीव्र उतारावर टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटले. टेम्पोने एकापाठोपाठ पाच दुचाकी आणि मोटारीला धडक दिली.

speeding goods tempo hit five to six vehicles
प्रातिनिधिक छायाचित्र

भरधाव मालवाहू टेम्पोने पाच ते सहा वाहनांना धडक दिल्याची घटना पिरंगुट परिसरात घडली. अपघातात टेम्पो चालकासह सात जण जखमी झाले. अपघातात एका मोटारीसह पाच दुचाकींचे नुकसान झाले. याप्रकरणी टेम्पोचालकाविरुद्ध पौड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोविंद लाल (वय २७, मूळ उत्तरप्रदेश) असे गुन्हा दाखल झालेल्या टेम्पो चालकाचे नाव आहे.

हेही वाचा >>> पुणे: दहावीच्या परीक्षा अर्जांसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

woman with schizophrenia calls the control room
स्किझोफ्रेनियाग्रस्त महिलेचे शंभरहून अधिक वेळा नियंत्रण कक्षाला दूरध्वनी
car accident chennai
रस्त्यावरून चालणाऱ्या पादचाऱ्याला भरधाव कारनं उडवलं अन्…; थरकाप उडवणारी घटना समोर
igatpuri accident, 2 dies in accident at igatpuri, two wheeler accident near igatpuri, one seriously injured in accident at igatpuri
नाशिक : इगतपुरीजवळील अपघातात दोन जणांचा मृ़त्यू
Nagpur Rain Flood, heavy rain in Nagpur, city flooded, ambazari lake overflow, rescue operation started
Nagpur Rain : अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो, तलावालगतच्या भागात दाणादाण; घराघरात पाणी शिरले, रेस्क्यू ऑपरेशन सुरू

ललित पाटील (वय ३४, रा. नाशिक) यांनी फिर्याद दिली आहे.  अपघातात पाटील यांच्यासह डॉ. मंगेश गायकवाड (वय ३८), बजरंग माझिरे (वय ५०, रा. भुकूम), पूनम माझिरे (वय २४, रा. भूकूम), श्रीकांत वाघमारे (वय ३३,रा. शिवणे), तसेच टेम्पोचालक लाल आणि मदतनीस (क्लिनर) हंसराज हिरालाल गौतम (वय १८ वर्षे) जखमी झाले आहेत. मालवाहू टेम्पोत वीट आणि सिमेंट होते.  टेम्पो पिरंगुट घाटातून पौडकडे निघाला होता. टेम्पोत क्षमतेपेक्षा जास्त माल होता. घाटातील तीव्र उतारावर टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटले. टेम्पोने एकापाठोपाठ पाच दुचाकी आणि मोटारीला धडक दिली. वाहनांना धडक दिल्यानंतर टेम्पो उलटला, अशी माहिती पौड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांनी दिली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Seven injured after speeding goods tempo hit five to six vehicles in pirangut area pune print news rbk 25 zws

First published on: 20-11-2023 at 22:21 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×