पुण्यात आज (रविवार) ब्राह्मण महासंघाच्यावतीने ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचा ७५ व्या वाढदिवसानिमित्त सन्मान करण्यात आला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना विक्रम गोखले यांनी पंतप्रधान मोदींचं कौतुक करत विविध मुद्द्य्यांवर प्रतिक्रिया दिली. त्याचप्रमाणे मुंबई क्रुझ ड्रग्ज प्रकरणावर देखील ते बोलले.

“देशाच्या सीमेवर २१ वर्षांचा जवान गोळी लागून मरतो तेव्हा तो खरा हिरो असतो. आर्यन हिरो नाही, मी अत्यंत स्पष्ट सांगतो. शाहरुख आणि आर्यन माझं काहीही वाकडं करू शकणार नाही.” असं विक्रम गोखले यांनी म्हटलं आहे.

deepak kesarkar
माझ्या विरोधात गंभीर गुन्हा दाखल नाही! शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे स्पष्टीकरण
Rohit Sharma Wife Ritika Sajdeh Real Lifestyle
रोहित शर्माची पत्नी म्हणून नव्हे तर रितिका सजदेहची ‘ही’ ओळख दाखवते तिची शक्ती; काम ते नातं, कसं आहे आयुष्य?
mla anna bansode reaction on former minister vijay shivtare stands against ajit pawar
शिवतारेंनी भूमिका बदलली नाही तर आम्ही महायुतीचा धर्म पाळणार नाहीत- आमदार अण्णा बनसोडे
saroj patil on sharad pawar
“भाजपाला वाटतं हा माणूस खलास केला की…”, सरोज पाटील यांचं शरद पवारांबाबतचं विधान चर्चेत; म्हणाल्या, “..म्हणून ते दगडं मारतायत!”

PHOTOS : शिवसेना-भाजपा युती, कंगना रणौत आणि पंतप्रधान मोदींबद्दल विक्रम गोखलेंनी मांडली भूमिका, म्हणाले…

तसेच, अभिनेत्री कंगणा रणौत हिने देशाच्या स्वातंत्र्याबद्दल केलेल्या विधानला देखील त्यांनी समर्थन दिले. “खरंय, कंगना रणौत जे म्हणालेली आहे, की ते भीक मागूनच मिळालेलं आहे यावर मी सहमत आहे. हे दिलं गेलं आहे बरं का. हे ज्या योद्ध्यांनी मिळवण्याचा प्रयत्न केला त्या योद्ध्यांना फाशी जाताना मोठमोठे लोक बघत राहिले. त्यांना वाचवलं नाही त्यांनी. आपल्या देशाचे हे लोक ब्रिटिशांविरुद्ध उभे राहत आहेत, हे बघून सुद्धा त्यांना फाशीपासून वाचवलं नाही, असेही लोक केंद्रीय राजकारणात होते. भरपूर वाचलेलं आहे मी.” असं कंगना रणौतच्या विधानावर प्रतिक्रिया देताना विक्रम गोखले म्हणाले.

स्वातंत्र्याची भीक मिळाल्याच्या कंगनाच्या वक्तव्याचं ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंकडून समर्थन; म्हणाले…

तर, राज्यातील राजकीय परिस्थितीवर प्रतिक्रिया देताना त्यांनी शिवसेना भाजपा युतीबाबतही मत व्यक्त केलं. तसेच, यावेळी त्यांनी शिवसेना व भाजपाला एकत्र येण्याचा सल्ला देत सूचक इशारा देखील दिल्याचं दिसून आलं.

“ लोकांची फसवणूक करु नका, अन्यथा एक दिवस…. ” ; विक्रम गोखलेंचा शिवसेना-भाजपाला सूचक इशारा!

विक्रम गोखले म्हणाले, “ज्या कारणासाठी बाळासाहेबांनी आपला देह ठेवला. बाळासाहेबांनी ज्यासाठी आपली शिवसेना स्थापन केली. ज्या मराठी माणसाला एक आधार वाटला. त्या बाळासाहेबांच्या आत्म्याला किती यातना होत असतील? याची कल्पना फक्त जे आता बाहेर राहून केवळ बघत आहेत, त्यांनाच येऊ शकते. त्यातला मी एक आहे. माझी सख्खी आत्येसासू ही बाळासाहेबांच्या महिला आघाडीची पहिली शिवसेना प्रमुख होती. बाळासाहेब माझे स्वतःचे मामे सासरे. तेव्हा बाळासाहेबांची भाषण ऐकूण महाराष्ट्र ४० वर्षे तृप्त झालेला आहे. त्यांच्या निधनानंतर राजकारणातील जे खेळ सुरू आहेत. ते इतक्या विचित्र स्तरावर पोहचलेले आहेत, की त्यामध्ये मराठी माणूस असो किंवा आता महाराष्ट्रपुरते बोलायचे तर महाराष्ट्रातील माणूस हा भरडला जातोय. लोक अस्वस्थ आहेत, तुम्हाला कल्पना नाही. प्रसारमाध्यमांना फारशी कल्पना नसते. आमच्या सारखी माणसं फिरत असतात, सर्व क्षेत्रातील लोकांचा आमचा संपर्क येतो. त्या प्रत्येकाचं हे म्हणणं आहे की हे सगळं गणित चुकलेलं आहे. परंतु हे गणित सुधारायचं असेल तर अजुनही वेळ गेलेली नाही. ज्या संकटाच्या कड्यावरती आता आपला देश उभा आहे, त्यातून त्याला मागे खेचायचं असेल तर भाजपा आणि शिवसेना यांनी एकत्र आलंचं पाहिजे, अशी माझी श्रद्धा आहे. माझे प्रयत्न सुरू आहेत. ”

“ महागाई मोदींनी वाढवली का? ” ; ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंचा सवाल!

याचबरोबर त्यांनी पंतप्रधान मोदी यांचं कौतुक देखील केलं. “जे लोक पक्षाचं काम करतात त्याबद्दल मी त्यांना काही बोलत नाही. पक्षाचं काम सगळेच करतात. पण मोदी जेव्हा देशासाठी उभं राहतात तेव्हा ते माझे आदर्श नायक असतात. मोदी जेव्हा पक्षासाठी काम करतात तेव्हा मी त्यांच्या बाजून उभा राहत नाही. महागाई काय मोदींनी वाढवली आहे का ? एका बॅरेलची किती किंमत झाली आहे तुम्हाला माहिती आहे का ? तुम्हाला हॉटेलमध्ये एका वेळी १० हजार रुपये खर्च करु शकता पण एक व्यक्ती देशात गेल्या ७० वर्षांपासून जी घाण साचली आहे ती साफ करत आहे, त्याला काही काळ का होईना मदत करता येत नाही?” असं विक्रम गोखले यावेळी म्हणाले.