पुणे: कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवड विधानसभा मतदार संघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणुक जाहीर झाली आहे. त्या निवडणुकीकरीता आज भाजपकडून कसबा पेठ विधानसभा मतदारसंघासाठी हेमंत रासने तर चिंचवड विधानसभा मतदार संघासाठी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> कसब्याची उमेदवारी न मिळाल्याने शैलेश टिळकांनी व्यक्त केली नाराजी; म्हणाले,”पुण्यातील ताईंच्या सहकार्‍यांनी..”

या पोटनिवडणुकीत टिळक कुटुंबीयांच्या रूपाने ब्राह्मण समजाला नेतृत्व करण्याची संधी पुन्हा मिळेल असे वाटत होते. मात्र ती संधी मिळाली नाही. त्यामुळे शहरात ब्राह्मण समाजाचं नेतृत्व करणारा चेहरा दिसत नाही. त्यावर शैलेश टिळक म्हणाले ” पुणे शहरात सध्या एकही ब्राह्मण उमेदवार नसल्याने ब्राह्मण समाजात ती अन्यायाची भावना आहे. ती देखील लोकांच्या मनात असण्याची शक्यता आहे”.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shailesh tilak statement after announcing kasba by election rasane candidature bjp brahmin society of injustice svk 88 ysh
First published on: 04-02-2023 at 15:28 IST