महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यातील संघर्ष गेल्या अनेक दिवसांपासून पाहायला मिळत आहे. अर्थसंक्लपीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा संघर्ष पाहायला मिळाला आहे. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांच्या घोषणांच्या गोंधळात राज्यपालांनी अवघ्या दोन मिनिटांत विधिमंडळातील अभिभाषण आटोपले आणि राष्ट्रगीत सुरू होण्यापूर्वीच ते सभागृहातून तडक निघून गेले. या विरोधाला राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज, तसेच महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्यासंदर्भात केलल्या वादग्रस्त वक्तव्यांची पार्श्वभूमी होती. त्यावरुन आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“हल्लीच्या राज्यपालांवर भाष्य न केलेले बरे. केंद्र सरकार घसरुन कोणत्या पातळीवर जात आहे याचे उदाहरण महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. राज्यातील मंत्रीमंडळाला विधानसभा, विधानपरिषदेवर सभासद नेमण्याचा अधिकार आहे. वर्ष होऊन गेले तरी १२ आमदारांच्या बाबतीत निर्णय घेतला जात नाही. याचा अर्थ काय? ज्या पदाची प्रतिष्ठा महाराष्ट्रात अनेकांनी सांभाळली ती आम्ही ठेवणारच नाही हा निर्धार ठेऊन कोणी काम करत असेल त्याच्यावर भाष्य न केलेले बरे. राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी त्याचा विचार करावा,” असे शरद पवार यांनी म्हटले.

sunil tatkare on raj thackeray support,
“रायगडमध्ये मनसेची मोठी ताकद, त्यामुळे…”; राज ठाकरेंच्या पाठिंब्यानंतर सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया
loksabha election 2024 election campaign material rates finally decrease
उमेदवारांचं चांगभलं! प्रचार साहित्याच्या दरात अखेर कपात; लोकसभा निवडणुकीत…
eknath shinde
मित्रपक्षांकडून युती धर्माचे पालन नाही; शिंदे गटाच्या आमदारांकडून नाराजी; ठाणे, पालघर पक्षाकडेच ठेवण्यासाठी आग्रह
43 percent Maratha women labour Report of the Backward Classes Commission
४३ टक्के मराठा महिला मजूर; मागासवर्ग आयोगाचा अहवाल; सरकारी नोकऱ्यांतील प्रतिनिधित्वही कमी

राज्यपालांसारख्या महत्त्वाच्या पदावर बसलेल्या व्यक्तीने विचार करून बोलायला हवे, अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपालांनी केलेल्या वक्तव्यांवर प्रतिक्रिया दिली आहे. राज्यपाल हे एक मोठे पद आहे. महत्त्वाच्या पदावर बसलेल्या व्यक्तीने बोलत असताना आपल्याकडे सगळय़ांचे लक्ष असते हे लक्षात ठेवावे आणि विचार करून बोलावे असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

वरिष्ठांच्या आदेशानंतर अधिकाऱ्यांकडून फोन टॅपिंग

पुण्यामध्ये बोलताना शरद पवार यांनी राज्यातील फोन टॅपिंग प्रकरणावरुनही भाष्य केले. “फोन टॅपिंगचे रेकॉर्ड मी स्वतः बघितलेले आहेत. गेली पाच वर्षे देवेंद्र फडणवीस यांचे सरकार होते त्या काळात फोन टॅपिंग झालेले आहे. या पद्धतीची लोकशाही आपण कधी पाहिली नव्हती ती त्यांनी केली. त्यामध्ये अधिकाऱ्यांनाही घेतले. अधिकाऱ्यांनी वरिष्ठांनी सांगितल्याने या गोष्टी कराव्या लागल्या. पण त्याची झळ अधिकाऱ्यांना बसली. ही स्थिती महाराष्ट्रात कधी आली नव्हती. पाच वर्षे यांच्या हातात सरकार असल्याने ही परिस्थिती आली, असे शरद पवार म्हणाले.