सूडबुद्धीने कारवाई केल्याचं पदाधिकाऱ्यांचे मत
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांना बारामती ऍग्रो कंपनीला बंद करण्यासंबंधी नोटीस पाठवल्याने शरद पवार गट आक्रमक झाला आहे. पिंपरी- चिंचवडमध्ये शरद पवार गटाने शिंदे- फडणवीस सरकारच्या विरोधात आंदोलन करत जाहीर निषेध केला आहे. सरकारने केलेली कारवाई ही सूडबुद्धीने केली आहे. याचा आम्ही जाहीर निषेध करतो. असं म्हणत पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या समोर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं.
हेही वाचा >>> पुणे:विसर्जन मिरवणुकीत नाचताना एकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
राष्ट्रवादीचे नेते आणि शरद पवार यांची नातू रोहित पवार यांची बारामतीमधील बारामती ॲग्रो कंपनीसंबंधी नोटीस बजावण्यात आली असून बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यावरून आता राज्यात राजकारण रंगल आहे. शरद पवार राष्ट्रवादी गट आक्रमक झाला आहे. पिंपरी- चिंचवडमध्ये शहराध्यक्ष आंदोलन करण्यात आलं. शिंदे- फडणवीस सरकारने केलेली कारवाई सूडबुद्धीने केलेली आहे. असं मत यावेळी तुषार कामठे यांनी दिली. यावेळी सरकारच्या विरोधात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. एकीकडे गेले काही दिवसांपासून रोहित पवार हे भाजप सरकारच्या विरोधात जोरदार टीकास्त्र सोडत होते, त्याचबरोबर ते आक्रमक झाले होते. त्यामुळे तर रोहित पवार यांना नोटीस बजावली नाही ना? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.