देशावर आजवर ज्या-ज्या वेळी संकट आली. त्या त्यावेळी ख्रिश्चन मिशनरीच्या माध्यमांतून पुढे येऊन काम करण्यात आले आहे. आज त्यांच्यातील एक बिशप डॉ.थॉमस डाबरे यांचं देखील समाजासाठी फार मोठे योगदान दिले आहे. या पार्श्वभूमीवर आज त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. ही समाधानाची बाब असून संकट काळात ख्रिश्चन मिशनरीचे महत्वाच योगदान असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते बिशप डॉ.थॉमस डाबरे यांचा पुण्यात विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी राज्यसभा खासदार वंदना चव्हाण, आमदार सुनील टिंगरे, आमदार चेतन तुपे यांच्यासह विविध क्षेत्रातील मंडळी यावेळी उपस्थित होते.




यावेळी शरद पवार म्हणाले, “माझ्या कायम आठवणीत राहणारी घटना ती म्हणजे किल्लारीचा भूकंप. त्यावेळी मी मुख्यमंत्री होतो. त्या पहाटे माझ्या खोलीमधील हालचालीवरून काही तरी वाटले. त्यावर मी कोयनेत फोन लावून विचारणा केली असता. किल्लारी येथे भूकंप झाल्याचे सांगण्यात आले. त्यावर मी आणि माझे सहकारी काही तासात किल्लारी येथे पोहचलो. तेव्हा लाखो घर पडली होतो. हजारो लोकांचा मृत्यू, तितकेच जखमी झाले होते. तेव्हाची परिस्थिती आज देखील आठवते. त्यावेळी तात्काळ यंत्रणेला काम लावले. तेव्हा ख्रिश्चन मिशनरी मार्फत गाव दत्तक घेऊन विकास कामे करण्यात आले.”
या घटनेसह ख्रिश्चन मिशनरीने अनेकवेळा समाजाने पुढे येऊन राज्यासह देशभरात काम केले आहे. पण मागील काही वर्षात नॉर्थ मध्ये काही गोष्टींचा त्यांना सामना करावा लागला. मात्र तरी देखील ख्रिश्चन मिशनरीच्या माध्यमांतून कार्य सुरूच राहिले असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.